सोनगीर येथील मुस्लीम सोशल ग्रुपतर्फे यशस्वी माध्यमातील दहावीत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेले झालेले तसेच, विविध क्षेत्रातील यशस्वीतांचा गुणगौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी सहायक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस होते. प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी भारती भामरे, सरपंच लखन ठेलारी उपस्थित होते.
दहावीतील अस्माबी अजमतखाँ पठाण, आयशाबानो कलीम शेख, तसकीनजहाँ मसुद कुरैशी, बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहायक कार्यकारी अधिकारीपदी झेप घेणाऱ्या चेतन दिलीप माळी आणि गटशिक्षणाधिकारी म्हणून भारती भामरे यांना बढती मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रभारी सरपंच लखन ठेलारी यांचा दहावी उत्तीर्ण झाल्याबद्दल गौरव करण्यात आला.
प्राथमिक शिक्षक अन्सार शेख, डॉ. कलीम शेख, अमीन शेख, हाजी युसुफ पठाण, हाजी हनीफ शेख, फकरुद्दीन शेख, मोहसीन शेख, इब्राहिम शेख, मोबीन शेख, नईम पठाण, रईस शेख, शेर खाँ पठाण, आलिम जियाउद्दीन, हाफिज जमील, हाफिज मुजाहिद, मजीद शहा, शरीफ शहा, हाजी शफिक कुरेशी, साबीर शहा, नवीद अहमद, मुख्तार मनियार, रुबाब शाह, मुख्तार खाँ, डॉ. पंकज बागूल, किरण खैरनार, पोलिस अधिकारी विजयसिंह राजपूत, कलीम शेख, बशीर मोमीन, साबीर सय्यद, अफजल मोमीन, आयुब शेख, आसिफ सय्यद आदी उपस्थित होते.
आरिफ खान पठाण यांनी सूत्रसंचालन केले. शफियोद्दीन पठाण यांनी आभार मानले. मुस्लिम सोशल ग्रुपचे आरिफ खान एस. पठाण, अशरफ खान पठाण, शेख शरीफ उर्फ मुन्नाभाई, आरिफ खान पठाण, अनिस कुरेशी, अल्ताफ कुरेशी, इरफान कुरेशी, हाजी इकबाल कुरेशी यांनी संयोजन केले.