भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत सरफराज खान,ध्रुव जुरेल आणि आकाश दीपला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. मध्यक्रमात फलंदाजी करणाऱ्या सरफराज खान आणि ध्रुव जुरेलने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत चांगली कामगिरी केली आहे. नुकताच बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची यादी जाहीर केली आहे. या यादीत सरफराज खान आणि ध्रुव जुरेलचा समावेश करण्यात आलेला नाही. दरम्यान लवकरच या दोघांचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या यादीत समावेश केला जाणार आहे.
सरफराज आणि ध्रुव जुरेलचा होणार फायदा..
बीसीसीआयच्या नियमानुसार १ ऑक्टोबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत जे खेळाडू ८ वनडे, ३ कसोटी किंवा १० टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार अशा खेळाडूंचा बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या यादीत ग्रेड सी मध्ये समावेश केला जाईल.
या मालिकेत पदार्पण करणाऱ्या सरफराज खान आणि ध्रुव जुरेलने आतापर्यंत केवळ २-२ सामने खेळले आहेत. धरमशाळा कसोटी सामना हा दोघांच्याही कसोटी कारकिर्दीतील तिसरा सामना असणार आहे. त्यामुळे दोघांचाही ग्रेड सी मध्ये समावेश केला जाऊ शकतो.
ए प्लसमध्ये या खेळाडूंचा समावेश..
विराट कोहली, जसप्रीत बुमराह रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा
ग्रेड ए
मोहम्मद सिराज, आर अश्विन, मोहम्मद शमी, शुभमन गिल, केएल राहुल आणि हार्दिक पंड्या
ग्रेड बी
रिषभ पंत, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव हे खेळाडू ग्रेड बीमध्ये आहेत.
ग्रेड सीमध्ये या खेळाडूंचा समावेश..
ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, शिवम दुबे, रवि बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, रिंकू सिंग, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.