भारतीय रेसिंग स्टार अतिका मीर हिची 'कार्ट रिपब्लिक' संघात निवड

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 d ago
अतिका मीर
अतिका मीर

 

सिंगापूर 

भारताची तरुण रेसिंग स्टार अतिशका मीर हिच्या कारकिर्दीत आणखी एक मोठी झेप घेतली असून, तिची इटलीच्या प्रसिद्ध 'कार्ट रिपब्लिक' (KR) या संघात नियुक्ती झाली आहे. या संघाची मालकी इटलीचे दिग्गज डीना चिएसा यांच्याकडे आहे, ज्यांनी लुइस हॅमिल्टनसह अनेक फॉर्म्युला वन जागतिक अजिंक्यपद विजेत्यांच्या कारकिर्दीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी

युरोपमधील विविध कार्टिंग मालिकांमध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीने चिएसा यांना प्रभावित केल्यानंतर, ११ वर्षीय अतिशकाने मध्य-हंगामात KR संघात प्रवेश केला आहे. चालू हंगामात तिने इटलीतील चॅम्पियन्स ऑफ द फ्यूचर अकादमी (COTFA) मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करत लक्ष वेधून घेतले होते. तसेच मे महिन्यात ग्रीसमध्ये झालेल्या COTFA च्या दुसऱ्या फेरीत तिने ऐतिहासिक यश संपादन केले होते.

श्रीनगरची ही तरुण रेसिंगपटू १९९२ नंतर फॉर्म्युला वनमध्ये पोहोचणारी पहिली महिला बनण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत आहे. 'कार्ट रिपब्लिक'मध्ये सामील झाल्यामुळे तिला आगामी दोन वर्षांत OKJ श्रेणीत (वय १२-१४ वर्षे) जगातील सर्वोत्कृष्ट ड्रायव्हर्ससोबत स्पर्धा करण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार आहे. अतिशका आपल्या या नव्या प्रवासाची सुरुवात इटलीमधील FIA वर्ल्ड कपमधून करणार आहे.