शुभमन गिलचे विक्रमी द्विशतक अन् रोहितचे शतक; भारताचा वेस्ट इंडिजवर ८ गडी राखून दणदणीत विजय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 32 m ago
शुभमन गिलचे विक्रमी द्विशतक अन् रोहितचे शतक
शुभमन गिलचे विक्रमी द्विशतक अन् रोहितचे शतक

 

गुवाहाटी 

भारतीय संघाने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन करत वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अजेय आघाडी घेतली आहे. सलामीवीर शुभमन गिलने अवघ्या १३३ चेंडूत नाबाद २२३ धावांची ऐतिहासिक खेळी करत सर्वात जलद एकदिवसीय द्विसतकाचा विक्रम नोंदवला, तर कर्णधार रोहित शर्माने ७५ चेंडूत १०१ धावांची खेळी केली.

वेस्ट इंडिजचे विशाल आव्हान लीलया पार

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने निर्धारित ५० षटकांत ७ बाद ४०५ धावांचा डोंगर उभा केला होता. वेस्ट इंडिजकडून जॉन कॅम्पबेल (१०८), शाई होप (१०४) आणि अमीर जांगू (११४) यांनी शतके झळकावली. भारतासमोर ४०६ धावांचे विशाळ लक्ष्य होते.

प्रत्युत्तरात भारताने रोहित शर्मा (१०१) आणि शुभमन गिल यांच्यातील २५५ धावांच्या धमाकेदार सलामीच्या भागीमुळे हा सामना सहज जिंकला. गिलने आपल्या खेळीत २६ चौकार आणि ८ षटकार मारले. भारताने ४३.३ षटकांत २ गडी बाद ४०६ धावा करत ३९ चेंडू राखून हा सामना आपल्या नावावर केला.