Virat Kohli 15000 ODI Runs: सचिन तेंडुलकरनंतर १५ हजार एकदिवसीय धावा करणारा विराट ठरला दुसरा फलंदाज

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 5 h ago
विराट कोहली
विराट कोहली

 

तिरुवनंतपुरम 

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार कामगिरी करत आपल्या कारकिर्दीतील ५५ वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. यासह त्याने क्रिकेट जगतात आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

डावाच्या सुरुवातीला अवघ्या ४० चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केल्यानंतर, विराटने ७४ व्या चेंडूवर षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत ६ षटकार आणि तितकेच चौकार मारत उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले.

१५ हजार एकदिवसीय धावांचा टप्पा पूर्ण

या सामन्यादरम्यान विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा पल्ला देखील पार केला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (१८,४२६ धावा) यांच्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा तो जगातील आणि भारताचा केवळ दुसरा फलंदाज ठरला आहे.