हिज्बुल्ला या दहशतवादी संघटनेकडून होत असलेल्या रॉकेट हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्राईलने आज लेबनॉनच्या दक्षिण भागात जोरदार हवाई हल्ले करत हिज्बुल्लाच्या ठिकाणांना लक्ष्य केले. हिज्बुल्लाकडून मोठ्या हल्ल्याची तयारी सुरू असल्यानेच खबरदारीचा उपाय म्हणून हे हल्ले केल्याचे इस्राईलने सांगितले.
इस्राईलने मागील महिन्यात लेबनॉनमध्ये केलेल्या एका तक्ष्यवेधी हल्ल्यात हिज्बुल्लाचा फवाद शुकूर हा म्होरक्या मारला गेला होता. त्याचा सूड माणून या संघटनेने गोलन टेकड्या आणि इस्राईलच्या उत्तर सीमेवर दोन दिवसांपूर्वी शेकडो रॉकेटचा मारा केला होता. आणखी मोठे हल्ले करण्याची सवारी लेबनॉनमध्ये सुरू असल्याचा दावा करत इस्राईलने आज पहाटेच ओस्दार हवाई मारा केला. लेबनॉनच्या ठिकाणांना लक्ष्य करत है हल्ले केल्याचा दावा इस्राईलने केला आहे. या हल्ल्यात झालेल्या हानीची माहिती समजलेली नाही. हिज्बुल्ला संघटनेला इराणचा उघड पाठिंबा असून इराणनेही इस्राईलचा सूड घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे इस्राईलच्या उत्तर सीमेवरही युद्ध भडकण्याचा धोका निर्माण झाला आहे.
हिज्बुल्लाकडून ड्रोन हल्ले
हिज्बुल्लाकडून आज ड्रोनचा वापर करत इस्राईलच्या लष्करी तळांना लक्ष्य केले. तसेच, आणखीही विविध ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, इस्राईलच्या हवाई संरक्षण यंत्रणेने बहुतांश ड्रोन हवेतच नष्ट केल्याचा दावा इस्राईलच्या लष्कराने केला. इस्राईलने आज गाझा शहराच्या दक्षिण भागातही जोरदार हवाई मारा केला. या हल्ल्यात ३५ हुन अधिक पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले. इस्राईलने मध्यरात्री गाझा, खान युनिस आणि हमाद या तीन भागांमध्ये हल्ले केले. या हल्ल्यांत ५० हुन अधिक जण जखमी झाले आहेत.
गोळी मारली तर बरे वाटेल
गाझा पट्टीच्या दक्षिण भागातही इस्राईलकडून हल्ले होत असल्याने काही नागरिक आपल्या मूळ गावी परतले आहेत. हवाई हल्ल्यांत आणि रणगाड्यांच्या माऱ्यांत अनेक घरांची पडझड झाली आहे. परतलेल्या नागरिकांना आपले घर ओळखणे अवघड झाले आहे. काही जण कोणत्याही घरात राहात आहेत. 'आम्ही हळूहळू मरतोय. आम्हाला खायला काही नाही, औषधे नाहीत. आम्हाला त्यांनी जा गोळी घालून मारून टाकले, तर बरे होईल,' अशी प्रतिक्रिया येथील काही नागरिकांनी दिली आहे.