'टीआरएफ'च्या दहशतवादाविरोधात भारताची आंतरराष्ट्रीय मोर्चेबांधणी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पहलगाम हल्ल्याचा सूड उगविल्यानंतर भारताने आता या हल्ल्याता जबाबदार असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट' या संघटनेला संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी संघटना' म्हणून घोषित कराचे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भारताच्या राजनैतिक अधिकान्यांच्या शिष्टमंडळाने आज संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी कार्यालय आणि यासंबंधीच्या कार्यकारी समितीच्या वरिष्ठ अधिका-यांची भेट घेतली. 

'द रेझिस्टना फ्रंट (टीआरएफ) ही पाकस्थित लष्को तैपचाचीच संलग्न संघटना आहे. या संघटनेने मागील वर्षभरात जम्मू-काश्मीरमध्ये कन्याच कारवाया केल्या आहेत. पहलगाममध्ये दहतवादी हल्ला करून २६ पर्यटकांची हत्या करण्यातही याच संघटनेचा हात आहे. त्यामुळे या संघटनेला जगाच्या नजरेसमोर आणत त्यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. भारतीय शिष्टमंडळाने आज संयुक्त राष्ट्रांच्या निबंध समितीच्या देखरेख पथकाचीही भेट घेतली. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी डीआरएफ' या संघटनेने स्वतःहून स्वीकारली होती. तरीही संयुक्त राष्ट्रांनी हल्ल्याचा निषेध करणारे निवेदन प्रसिद्ध करताना 'टीआरएफ'चे नाव घेणे टाळले होते. 

भारतीय अधिकाऱ्यांनी ही बाब संयुक्त राष्ट्रांच्या निदर्शनास आणून दिल्याचे समजते. संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादाविरोधात अनेक ठराव मंजूर केले असून त्यानुसारच 'टीआरएफ'ला दहशतवादी संघटना घोषित करण्यासाठी भारताचे प्रयत्न असल्याचे समजते. याशिवाय, सायबर सुरक्षा दहशतवाद्यांच्या प्रवासावर निबंध, दहशतवादाला कही पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत करणे आणि दहशतवाद्यांना मिळणारा निधी रोखणे या मुक्ष्यांवरही भारतीय शिष्टमंडळाने चर्चा केल्याचे समजते.

'पाकमध्ये अणुगळती नाही' 
नवी दिल्ली: भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये पाकिस्तानमधील अणुकेंद्रांचे कोणतेही नुकसान झाले नसून अणुगळती किंवा किरणोत्सर्ग झाला नसल्याचे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने स्पष्ट केले आहे. 'ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या अणुकेंद्रांचेही नुकसान झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरल्यानंतर चिंता व्यक्त केली जात होती. भारतीय हवाई दलानेही अणुकेंद्रांना लक्ष्य केले नसल्याचे स्पष्ट केले होते.