अंतराळात अडकून असलेल्या अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर यांना पृथ्वीवर कसे आणि कधी परत आणायचे यावर विचार नासा करत आहे. या दोघांना परत आणण्यासाठी नासाकडे दोन पर्याय आहेत. पहिला - बोईंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये परत आणणे. दुसरा - स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमध्ये परत आणणे.
बुच विलमोर आणि सुनीता विलियम्स जूनच्या सुरुवातीपासून अंतराळात आहेत. त्यांचे आठ दिवसांचे मिशन आता दोन महिन्यांचे झाले आहे आणि कदाचित आठ महिन्यांहून अधिकही चालू राहू शकते.
बोईंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये अनेक समस्या आल्या आहेत. हीलियम गळती हे एक मोठे कारण होते. त्यामुळे या कॅप्सूलमध्ये त्यांना परत आणणे धोकादायक ठरू शकते. याउलट स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमध्ये परत आणणे सुरक्षित असले तरी त्यासाठी फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल. यावर निर्णय घेण्यासाठी नासा पुढच्या आठवड्यात बैठक घेणार आहे.
अंतराळवीरांना काही धोका आहे का?
अंतरळवीरांना काहीही धोका नाही असे नासाने सांगितले आहे. अंतराळ स्थानकावर पुरेसे सामान आहे. ते सुरक्षित आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत अंतराळ स्थानकावरून बाहेर पडण्यासाठी स्टारलाइनरचा वापर लाईफबोट म्हणून केला जाऊ शकतो. नासा पुढच्या आठवड्यात निर्णय घेईल.अंतराळवीरांना या प्रकरणाबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही.
नासा दोन कंपन्यांचा वापर का करते?
अंतराळात सामान आणि अंतरळवीरांना पाठवण्यासाठी नासाने दोन कंपन्यांची निवड केली होती. (बोईंग आणि स्पेसएक्स)
जर एका कंपनीच्या वाहनात समस्या आली तर दुसरी कंपनी मदत करू शकेल.
बोईंग काय म्हणते?
बोईंग अजूनही स्टारलाइनर कॅप्सूल सुरक्षित असल्याचे सांगत आहे.परंतु जर नासा निर्णय घेतला तर ते कॅप्सूल रिकामे परत आणतील.
Starliner मध्ये झालेल्या समस्यांमुळे नासाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. लवकरच या समस्येवर तोडगा काढून अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणण्याची योजना नासा आखत आहे.