पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर अमेरिका-इराण युद्धाला अल्पविराम?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे मुख्यमंत्री शहबाज शरीफ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे मुख्यमंत्री शहबाज शरीफ

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (७ एप्रिल) इराणवरील बॉम्बफेक आणि हल्ले दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी स्थगित करण्यास आपण सहमत असल्याचे सांगितले. वॉशिंग्टन आणि तेहरानमध्ये मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या पाकिस्तानच्या नेत्यांशी आपले बोलणे झाले असून त्यांनी इराण युद्धात दोन आठवड्यांच्या युद्धबंदीची मागणी केली होती, असे ट्रम्प यांनी नमूद केले.

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले की, "पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्याशी झालेल्या संभाषणाच्या आधारे मी हा निर्णय घेतला आहे. आज रात्री इराणवर करण्यात येणारे विनाशकारी हल्ले रोखण्याची विनंती त्यांनी मला केली होती. इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे, त्वरित आणि सुरक्षितपणे उघडण्यास संमती दिल्यास, मी इराणवरील बॉम्बफेक आणि हल्ले दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्यास तयार आहे."

इराणवर अमेरिकेचे मोठे हल्ले होण्याची शक्यता असताना पाकिस्तानने शेवटच्या क्षणी हा प्रस्ताव मांडला होता. करार झाला नाही तर "आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल," असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली.