मला माझ्या मुलांना भेटायचं आहे : नवाजुद्दीन सिद्दीकी

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
अखेर मुलांसाठी नवाजने बायकोसमोर घेतलं नमतं
अखेर मुलांसाठी नवाजने बायकोसमोर घेतलं नमतं

 

बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आजकाल त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. त्याचे गेल्या अनेक दिवसांपासून त्याची पत्नी आलियासोबत वाद सुरु आहेत.

आलियाने नवाजवर अनेक गंभीर आरोप केले आहेत तर नवाजनेही तिच्या आरोपांचे खंडन करत ती हे सगळं केवळ पैशासाठी करत असल्याचं म्हटलं आहे. या दोघांमध्ये सुरू असलेला वाद न्यायालयीन खटल्याबाबत दररोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. कधी आलिया सोशल मीडियावर नवाजबद्दल व्हिडिओ शेअर करते तर कधी नवाज तिच्याबद्दल मेसेज लिहितो, तर कधी नवाज असे करतो. पण आता या बिघडलेल्या प्रकरणाबाबत एक मोठे अपडेट समोर आली आहे.

आता बातमी समोर येत आहे की त्याला शक्य तितक्या लवकर आपल्या मुलांना भेटायचं आहे आणि त्यामुळे करण्यासाठी तो त्याची याचिका मागे घेण्यासही तयार असल्याचं त्याचं म्हणनं आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले आहे की, मला फक्त आपल्या दोन्ही मुलांना भेटायचं आहे आणि तसं झाले तर तो त्याची याचिका मागे घेईल. त्याच्या वकिलाने सांगितले की, मुले दुबईतील त्यांच्या शाळेतून बेपत्ता होती आणि नवाज त्यांचा शोध घेऊ शकला नाही. त्यामुळेच त्यांनी हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. या याचिकेत मिळू शकणारा मर्यादित दिलासा मला माहीत आहे.

नवाज बऱ्याच दिवसांपासून आपल्या मुलांना भेटला नाही आणि त्यांच्याबद्दल काळजीत आहे. आलियाने मुलांना भेटण्याची परवानगी दिली तर तो आपली याचिका मागे घेईल. नवाजच्या वकिलाने त्याचा बचाव केला, तर त्याची पत्नी आलियाचा वकील शिखर खंडेलवाल म्हणाला की, " याचिका निष्फळ होती कारण ती दाखल केली तेव्हा माझा क्लायंट अभिनेत्याच्या आईच्या बंगल्यात दोन्ही मुलांसह राहत होता." 

पुढे तिचा वकिल म्हणाला की, माझा क्लायंट हे प्रकरण मिटवायला तयार आहे. पण जेव्हा ती मुलांसोबत नवाजच्या आईच्या घरी राहात होती, तेव्हा मुलं कुठे आहेत हे त्याला कळलं नाही असं कसं होईल? तो आपल्या मुलांना भेटायला मोकळा आहे. केव्हाही भेटू शकतो, पण तो स्वत: त्यांना भेटत नाही.