WWE सुपरस्टार जॉन सीनाही आहे किंग खानचा चाहता!

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 2 Months ago
शाहरुख खान जॉन सीना फोटो
शाहरुख खान जॉन सीना फोटो

 

किंग खान शाहरुखचे साऱ्या जगभर चाहते आहेत. केवळ भारतच नाही तर जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. अशातच त्याच्या एका चाहत्यानं सोशल मीडियावर शेयर केलेल्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आलं आहे.

त्या व्हिडिओमध्ये असं नेमकं काय घडलं हे आपण जाणून घेणार आहोत. हॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी हे देखील शाहरुखचे चाहते आहेत. ते शाहरुखच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलचे चाहते आहेत. अशातच WWE चा स्टार जॉन सीनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात तो किंग खानच्या दिल तो पागल है मधील गाणं गुणगुणताना दिसतो आहे. त्या व्हिडिओवर आलेल्या कमेंटसही भन्नाट आहेत.
यापूर्वी देखील जॉन सीनानं किंग खानचे कौतुक केल्याचे दिसून आले आहे. मात्र त्याचा आताचा व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. त्यानं शाहरुखचं भोली सी सूरत आखो में मस्ती...नावाचं गाणं म्हटलं आहे. शाहरुखचा एक चाहता त्याला ते गाणं म्हणण्यासाठी विनंती करतो आणि जॉन सीना ते गाणं म्हणू लागतो असे त्या व्हिडिओमध्ये दिसते.

इंस्टावरुन व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी जॉन सीनाचं कौतुक करत त्याला धन्यवाद दिले आहे. काहींनी त्याला बॉलीवूडमधील शाहरुखचे गाणे म्हटल्याबद्दल त्याच्या मोठेपणाची स्तुतीही केली आहे. शाहरुखच्या एका फॅन पेजमाध्यमातून तो व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे.

शाहरुखच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास त्याचा डंकी नावाचा चित्रपट खास व्हॅलेंटाईनच्या निमित्तानं नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. येत्या काळात किंग खान केजीएफ फेम यशच्या टॉक्सिक नावाच्या चित्रपटामध्ये कॅमिओ करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र याबाबत मेकर्सकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.