ज्युनियर मेहमूद या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते नईम सय्यद यांचे काल रात्री २ वाजता मुंबईत निधन झाले. ते पोटाच्या कर्करोगाने त्रस्त होते आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. आजच्या दुपारच्या प्रार्थनेनंतर सांताक्रूझ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
नईम सय्यद यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. नुकतेच त्यांनी आपले मित्र जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांचीही भेट घेतली होती. त्यांनी मित्रांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावेळी त्यांच्या भेटीचे फोटोही समोर आले होते, ज्यात ज्युनिअर महमूदची अवस्था पाहून जितेंद्रचे डोळे ओले झाले होते. जॉनी लिव्हरनेही त्यांची भेट घेऊन हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
ज्यूनियर महमूद यांनी त्यांच्या करिअरबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांचे खरे नाव नईम सैय्यद होतं. त्यांचा जन्म नोव्हेंबर १९५६ साली झाला होता. त्यांनी आपल्या करिअरमध्ये २६५ हून अधिक चित्रपटात काम केलं होतं.त्यांनी तब्बल सात भाषांमधील चित्रपटांत काम केलं होतं, त्यांनी मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले होते. जौहर महमूद इन हॉन्ग कॉन्ग, गुरू और चेला, बॉम्बे टू गोवा या चित्रपटांमधून त्यांनी काम केलं आहे.