बॉक्स ऑफिसवर 'किंग विरुद्ध किंग'; शाहरुख खानचा 'किंग' आणि नागार्जुनचा 'किंग १००' एकाचवेळी रिलीज होणार का?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
नागार्जुन आणि शाहरुख खान
नागार्जुन आणि शाहरुख खान

 

मुंबई 

बॉलिवूडचा 'किंग' खान म्हणजेच शाहरुख खान आणि साऊथ सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता नागार्जुन आगामी काळात बॉक्स ऑफिसवर आमनेसामने येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या दोन्ही स्टार्सचे आगामी चित्रपट एकाच दिवशी रिलीज होण्याच्या चर्चांनी जोर धरला असून, यामुळे एका दुर्मिळ 'किंग विरुद्ध किंग' (King vs King) बॉक्स ऑफिस क्लॅशची शक्यता निर्माण झाली आहे.

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला शाहरुख खानचा बहुचर्चित ॲक्शन एंटरटेनर चित्रपट 'किंग' आणि नागार्जुनचा १०० वा महत्त्वाचा चित्रपट मानला जाणारा 'किंग १००' एकाच मुहुर्तावर रिलीज होण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही चित्रपटांच्या नावामध्ये 'किंग' हा शब्द जोडलेला असल्याने आणि दोन्ही अभिनेते आपापल्या इंडस्ट्रीत 'किंग' म्हणून ओळखले जात असल्याने सोशल मीडियावर या संभाव्य क्लॅशची जोरदार चर्चा सुरू आहे.

चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

सध्या दोन्ही चित्रपट निर्मितीच्या वेगवेगळ्या टप्प्यात असून त्यांच्या रिलीजच्या तारखा अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेल्या नाहीत. जर हे दोन्ही सिनेमे खरोखरच एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर उतरले, तर हिंदी आणि तमीळ-तेलगू सिनेमाच्या चाहत्यांसाठी हा एक अत्यंत रोमांचक मुकाबला ठरेल. मात्र, ऐनवेळी प्रदर्शनाच्या तारकांमध्ये बदल होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे चित्रपट वर्तुळातील सूत्रांचे म्हणणे आहे.