मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्कर आणि तिचा पती फहाद अहमद यांच्या घरी एका परीचं आगमन झालं आहे. अर्थात या जोडप्यानं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. स्वरानं स्वतः सोशल मीडियावर पोस्टद्वारे आपल्या लेकीचा फोटो शेअर केला आहे.
स्वरानं लेकीचं नावंही केलं जाहीर
"माझी एक प्रार्थना ऐकली, एक आशीर्वाद दिला. एक गाणं मी कुजबुजलं अन् एक गूढ सत्य समोर आलं. आमची मुलगी राबिया हिचा जन्म २३ सप्टेंबर २०२३ रोजी झाला. कृतज्ञ आणि आनंदी अंतःकरणानं तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद! माझ्यासाठी हे संपूर्ण नवीन जग आहे," स्वरानं आपल्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे.
गौहर खानच्या शुभेच्छा
स्वराच्या पोस्टवर कमेंट्समधून अभिनंदनाचा वर्षाव झाला असून अनेक सेलिब्रेटिंनी आणि सिनेसृष्टीतील कलाकारांनी स्वरा आणि फहाद यांच्याचं भरभरुन अभिनंदन केलं आहे. अभिनेत्री गौहर खान हीनं शुभेच्छा देताना म्हटलं की, "खूप खूप अभिनंदन. सर्वशक्तिमान शक्ती आपल्या बाळाचे रक्षण करो आणि तिला आयुष्यातील सर्व चांगुलपणाचा आशीर्वाद देवो. आमीन"
सेलिब्रेटिंकडून अभिनंदनाचा वर्षाव
लव्हच्या इमोजीसह "बहुत बहुत ज्यादा मुबारक" असं झिशान आयुब यानं म्हटलं आहे. त्याचबरोबर साक्षी जोशीनं म्हटलं, तुम्हा दोघांचं अभिनंदन, तुमचं बाळ सुखरुप असेल अशी आशा करते. अभिनेत्री टिस्का चोप्रानं म्हटलं, अभिनंदन डार्लिंग स्वरा आणि फहाद. नीना गुप्ता यांनी अभिनंदन असं म्हटलं आहे.