बॉलिवूडचा बादशाह कतारमध्येही किंग!

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 2 Months ago
शाहरुख खानचे कतारचे पंतप्रधान स्वागत करताना
शाहरुख खानचे कतारचे पंतप्रधान स्वागत करताना

 

कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आठ भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. यापैकी सात जण भारतात परतले आहेत. अशातच आता बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा कतारमध्ये गेला आहे. कतारमधील शाहरुखचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये शाहरुख हा कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जस्सिम अल थानी यांच्यासोबत पोज देताना दिसत आहे.

सोशल मीडियावर किंग खानचे काही फोटो व्हायरल झाले. या फोटोमध्ये कतारचे पंतप्रधान आनंदानं शाहरुखचं स्वागत करताना दिसत आहेत. या फोटोमधील शाहरुखच्या हेअर स्टाईलनं आणि लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. शाहरुख खान युनिवर्स फॅन क्लब अशा नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शाहरुख आणि कतारचे पंतप्रधान यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोला कॅप्शन देण्यात आलं, "कतारचे पंतप्रधान महामहिम शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जस्सिम अल थानी यांनी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचे विशेष पाहुणे म्हणून दोहा येथे स्वागत केले."

कतार येथील एएफसी आशियाई कप फायनलमध्ये शाहरुख फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनोसोबत लेन्ससोबत पोज देताना दिसला. दोहा येथील एक प्रदर्शन देखील किंग खाननं पाहिलं.

शाहरुखचे चित्रपट
2023 हे वर्ष शाहरुखसाठी खास ठरले. गेल्या वर्षी शाहरुखचे डंकी, पठाण आणि जवान हे चित्रपट रिलीज झाले. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. आता शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.