ट्रोलरने घेतला पंगा तर किंग खाननेही दाखवला इंगा!

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 1 Years ago
शाहरुख खान
शाहरुख खान

 

बॉलिवूडचा किंग म्हणजेच शाहरुख खान नंतर आता त्याची मुलगी सुहाना खान बॉलिवूडमध्ये पदापर्ण करण्यासाठी सज्ज झाली आहे. सुहाना 'द आर्चिज'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिचा हा चित्रपट 7 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.

तर दुसरीकडे शाहरुख खान देखील त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. शाहरुख लवकरच डंकी या चित्रपटात दिसणार आहे. शाहरुख खानचा 'डंकी' चित्रपट 21 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

शाहरुखचा हा सिनेमा यावर्षीचा तिसरा मोठा हिट सनेमा असल्याचे बोलले जात आहे. यावर्षी शाहरुखचे जवान आणि पठाण हे दोन सिनेमे सुपरहिट ठरले होते. त्यामुळे आता चाहत्यांच्या नजरा डंकी चित्रपटाकडे लागल्या आहेत. शाहरुख खान सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

शाहरुखने नुकतच त्याच्या चाहत्यांसोबत ASKSRK सेशल घेतलं. या दरम्यान चाहत्यांनी नेहमी प्रमाणे शाहरुखला खुप सारे प्रश्न विचारले. मात्र यावेळी एका चाहत्याने शाहरुखला असा काही प्रश्न विचारला की त्यामुळे किंग खान थोडासा नाराज झाला. तरी देखील शाहरुखने या प्रश्नाचे उत्तर दिले.

शाहरुख खानने बुधवारी त्याच्या चाहत्यांसाठी त्याच्या X वर ASK SRK सत्र आयोजित केले. यात एका नेटकऱ्याने त्याला विचारले की, तुझ्या पीआर टीममुळे तुमचे शेवटचे दोन टुकार  चित्रपट ब्लॉकबस्टर ठरलं. तुला अजूनही तुझ्या पीआर आणि मार्केटिंग टीमवर विश्वास आहे का की 'डंकी'ही हिट होईल?.. बॉलिवूडच्या आणखी एका टुकार चित्रपटाला एक गोल्डन फिल्म बनवली जाईल.”

या नेटकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुख म्हणाला, "मी तुमच्यासारख्या बुद्धिमान लोकांना उत्तर देत नाही. परंतु मी तुम्हाला हे सांगेन की, तुम्हाला कदाचित बद्धकोष्ठतेच्या (अपचनाच्या) समस्येने ग्रासले आहे. यावर उपचार करणं खुप आवश्यक आहे. म्हणून मी माझ्या पीआर टीमला तुम्हाला चांगले औषध आणि उपचार देण्यास सांगेन... आशा आहे तुम्ही लवकर बरे व्हाल."

सध्या शाहरुखच्या या ट्विटची सोशल मिडियावर चर्चा रंगली आहे. नेटकरी शाहरुखचे कौतुक करत आहेत. शाहरुख सध्या डंकी निमित्ताने ट्विटरवर #askSRK निमित्ताने चाहत्यांच्या संपर्कात असतो.

'डंकी' हा चित्रपट शाहरुखचा या वर्षातील तिसरा मोठा आणि बहुप्रतिक्षित असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटात तापसी पन्नू आणि विकी कौशल सारखे लोकप्रिय कलाकारही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणार आहे.

शाहरुखचा डंकी ख्रिसमसच्या मुहूर्तावर म्हणजेच 22 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.