गेल्या काही दशकांपासून बॉलीवूडमध्ये शाहरुखचा दबदबा आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही. शाहरुख ते बॉलीवूडचा किंग खान हा त्याचा प्रवास वाखाणण्यासारखा आहे. रोमान्सचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखनं आपल्या मेहनतीच्या बळावर नाव आणि पैसा कमावला आहे. आज त्याच्याजवळ पैशाची काही कमी नाही. त्याच्याकडं एकापेक्षा एक लक्झुरियस गाड्या आहेत आणि करोडोंच्या आलिशान घरात तो राहतो.
सध्या सोशल मीडियावर शाहरुख खानच्या दुबईतील बंगल्याचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. घराच्या आतमधला नजारा पाहाल तर नक्कीच थक्क व्हाल. 'पठाण' फेम अभिनेता शाहरुख खानजवळ मुंबई ते दिल्लीपर्यंत एकापेक्षा एक आलिशान घरं आहेत. आपल्या सगळ्यांनाच शाहरुख खानचं पहिलं आलिशान घर जे त्याच्या स्वप्नातील घर होतं त्या 'मन्नत' बंगल्याविषयी माहित असेल.
या बंगल्याला अभिनेत्यानं २००१ मध्ये खरेदी केलं होतं. शाहरुखचं दुबईमध्ये देखील आलिशान बंगला आहे, ज्याचं नाव 'जन्नत' आहे. अर्थात आता हे दुबईतील घर त्यानं खरेदी केलं नव्हतं तर ते त्याला गिफ्ट म्हणून दिलं गेलं होतं. दुबईच्या पाम जुमेराहच्या समोर असलेल्या शाहरुख खानच्या 'जन्नत' बंगल्याचा एक व्हिडीओ SRK फॅन पेजला शेअर केला गेला आहे. जो सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे.
व्हिडीओत स्वतः शाहरुखनं खुलासा केला आहे की त्यानं हे घर स्वतः खरेदी केलं नाही तर त्याला नखीलनं हे गिफ्ट दिलं आहे. नखील हे दुबईतील बेस्ट डेव्हलपर आहेत, ज्यांनी २००७ मध्ये हा बंगला शाहरुखला गिफ्ट केला होता. व्हिडीओमध्ये शाहरुख दुबईस्थित आपल्या घराविषयी बोलताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये पाहिलं जाऊ शकतं की शाहरुख आपल्या कारमधून उतरून लग्झुरियस व्हाइट मेन्शनमध्ये एन्ट्री करत आहे. सी फेसिंग बंगल्यातून अथांग समुद्राचा नजारा पाहून डोळ्याचं पारणं फिटत आहे. क्लिपमध्ये शाहरुख समुद्राच्या किनारी आपल्या मुलांसोबत फिरताना दिसत आहे आणि घराचा कानाकोपरा न्याहाळताना दिसत आहे.
हाऊसिंग डॉट कॉम नुसार, शाहरुखचं दुबईतील हे घर जवळपास १०० करोडचं आहे. शाहरुखचा हा व्हिला जवळपास ८,५०० स्क्वेअर फिटमध्ये पसरला आहे. दोन मजली घराला एक प्रायव्हेट बीच एरिया देखील आहे. त्याच्या बंगल्यात रिमोटवर चालणारं गॅरेज देखील आहे. या घराचं इंटिरियर गौरी खाननं केलं आहे.
शाहरुखला नुकतंच आपण 'पठाण' सिनेमात पाहिलं होतं. तब्बल ४ वर्षांनी या सिनेमातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करणाऱ्या शाहरुखनं दाखवून दिलं होतं कि आजही तोच किंग आहे. 'जवान' आणि 'डंकी' या त्याच्या सिनेमांची प्रेक्षक आता वाट पाहत आहेत.