OpenAI Agent Dots Launched: ओपनएआयचा नवीन 'ऑलवेज-ऑन' एआय एजंट लाँच; सॅम ऑल्टमनची मोठी घोषणा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
सॅन फ्रान्सिस्कोमधील परिषदेत ओपनएआयचा नवीन 'ऑलवेज-ऑन' एआय एजंट सादर करताना सीईओ सॅम ऑल्टमन
सॅन फ्रान्सिस्कोमधील परिषदेत ओपनएआयचा नवीन 'ऑलवेज-ऑन' एआय एजंट सादर करताना सीईओ सॅम ऑल्टमन

 

सॅन फ्रान्सिस्को 

सुरक्षेच्या कारणास्तव एका प्रगत मॉडेलचे लाँचिंग पुढे ढकलल्यानंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'ओपनएआय'चे (OpenAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांनी एक नवीन आणि अत्यंत सक्षम 'ऑलवेज-ऑन' एआय एजंट सादर केला आहे. कंपनीच्या वार्षिक विकसक परिषदेत (Developer Conference) हा नवा प्रगत एआय एजंट लाँच करण्यात आला आहे.

'डॉट्स्' (Dots) एआय एजंटचे वैशिष्ट्ये

ओपनएआयने सादर केलेल्या या नव्या एजंटचे नाव 'डॉट्स्' (Dots) असे आहे. हे एजंट वापरकर्त्यांच्या वतीने त्यांचे सुरू असलेले टास्क सक्रियपणे पूर्ण करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. मेटाच्या पर्सनल एजंट 'म्युज'ला (Muse) टक्कर देण्यासाठी हे फिचर आणण्यात आले आहे. हे एआय युजर्ससाठी नेहमी तत्पर असणाऱ्या मित्रासारखे काम करेल, असे ऑल्टमन यांनी सांगितले.

जीपीटी-६.१ सोल आणि 'अल्ट्राफास्ट' टियरची घोषणा

या परिषदेदरम्यान ओपनएआयने आपल्या मॉडेल्समध्येही मोठे अपग्रेड जाहीर केले आहेत. यामध्ये 'जीपीटी-६.१ सोल' (GPT-6.1 Sol) हे सुधारित मॉडेल आणि 'अल्ट्राफास्ट' नावाचा एक प्रीमियम स्पीड टियर लाँच करण्यात आला आहे. दरम्यान, व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि सिलिकॉन व्हॅलीच्या इतर दिग्गज कंपन्यांच्या प्रमुखांची एआय नियमनाबाबत बैठक सुरू असतानाच ओपनएआयने हे नवे तंत्रज्ञान सादर केले आहे.