गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील मुस्लीम समुदायाचा कौतुकास्पद निर्णय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
सोलापूर : इंपिरियल सभागृहात मुस्तफा-ए-रहमतच्या सर्वधर्मीय संवाद कार्यक्रमात बोलताना डॉ. राजेंद्र माने.
सोलापूर : इंपिरियल सभागृहात मुस्तफा-ए-रहमतच्या सर्वधर्मीय संवाद कार्यक्रमात बोलताना डॉ. राजेंद्र माने.

 

सोलापूर : “सोलापूरकरांची धार्मिक सौहार्दाची भावना ही सर्वोत्तम असून शांततापूर्ण उत्सवांचे शहर म्हणून ही ओळख कायमच आहे. त्यासाठी सर्वच समाज घटकांना हातभार लागत असतो. शांतता व सुव्यवस्था ही पोलिसांची जबाबदारी नसून पिढ्यानपिढ्या आनंदाने राहणाऱ्या नागरिकांची ती गरज आहे,” असे प्रतिपादन पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी व्यक्त केले. 

सोलापूरातील इंपिरियल सभागृहात रहमत-ए-मुस्तफा संस्थेचे संस्थापक रसूल पठाण यांच्या पुढाकाराने गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सर्वधर्मीय संवाद मेळाव्याचे आयोजन प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, “सोलापूर शहरात सातत्याने विविध जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. अनेक प्रकारचे उत्सव व मिरवणुका आयोजित केल्या जातात. शहर वासियांचे उत्सवासाठी परस्परांना असलेले सहकार्य पाहता हे येत्या काळात सुरु राहणार आहे.” 

मुस्लीम बांधवांच्या कौतुकास्पद निर्णयाबद्दल बोलताना दास शेळके म्हणाले, “मुस्लीम समाज बांधवांनी गणेश विसर्जनासाठी ईद-ए-मिलादची मिरवणूक शुक्रवारी (ता. २९) काढण्याचे ठरवले आहे. यासाठी आयोजक कौतुकास पात्र आहेत. रसूल पठाणांनी धार्मिक सौहार्दासाठी केलेले प्रयत्न देखील मोलाचे आहेत. कोणत्याही स्थितीत गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर मिरवणुकीत होणार नाही यासाठी आम्ही कटिबद्ध असणार आहोत.” 

ज्येष्ठ समाजसेवक मकबूल मोहोळकर यांनी सोलापूरच्या धार्मिक शांततेबद्दल सांगितले की, “ग्रामदैवत सिध्दरामेश्वराच्या कृपेने या शहरात नेहमीच धार्मिक शांतता राहीली आहे. त्यांच्या काळात असलेले सुफीसंत व स्वतः सिध्दरामेश्वरांच्या स्नेहपूर्ण संबंधामुळे शहराच्या धार्मिक ऐक्याचा पाया रचला गेला. तो आपण सर्वांनी पुढे चालवला पाहिजे.” सकाळचे निवासी संपादक अभय दिवाणजी यांनी यावेळी ‘सकाळ’ची भूमिका विशद केली. 

यावेळी व्यासपीठावर सहायक आयुक्त राजेंद्र मोरे, ‘सकाळ’चे निवासी संपादक अभय दिवाणजी, संयोजक रसूल पठाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हाजी मकबूल मोहोळकर, वाहेद नदाफ, जाकीरभाई नाईकवाडी, मध्यवर्ती मंडळ पदाधिकारी जयवंत सलगर, सचिन गलदुरे, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, शांतता कमिटी सदस्य दास शेळके, म.अली बडेपीर, एम.डी. शेख, विशाल ताकमोगे, वाहेद नदाफ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक रसूल पठाण यांनी तर, सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केले. 

- प्रकाश सनपूरकर, सोलापूर
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या धार्मिक सौहार्दाच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻 

 

‘ईद ए मिलाद’चा जुलूस २९ सप्टेंबरला; वणीत मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय

 

अनंत चतुर्दशीनंतर निघणार ईद- ए- मिलादची मिरवणूक; मुस्लिम बांधवांकडून सलोख्याचा संदेश

 

जुन्नरला सामाजिक सलोख्याचे दर्शन; गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पैगंबर जयंतीची मिरवणूकीचा निर्णय

 

किन्हवलीतील मुस्लिम बांधवांचे एक पाऊल पुढे


अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी. मिरवणुकीबाबत मुस्लीम समाजाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र होतेय कौतुक

 

अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी आल्यामुळे सोलापूरच्या मुस्लीम समाजाने घेतला 'हा' निर्णय


अनंत चतुर्दशी अन् ईद एकाच दिवशी, मुस्लिम समुदायाने घेतला 'हा' मोठा निर्णय


नाशिकच्या चांदोरीतील मुस्लीम समाजाने घेतला 'हा' ऐतिहासिक निर्णय


हिंदू मुस्लीम धार्मिक सलोखा जपणारे भद्रकाली तलावडी मित्र मंडळ


मुस्लिम कारागिर साकारत आहेत नगरमधील श्री विशाल गणेश मंदिर


गणरायाच्या पूजेसाठी मुस्लीम बांधवांच्या दुकानातील हळदी-कुंकू


गणेशोत्सवात असे सहभागी होतात मुंबईकर मुस्लीम

 

धुळ्यातील रिजवानने बनवला इकोफ्रेंडली बाप्पा, मिळवले बक्षीस!

 

श्रीगणेशाला अभिवादन करणारे उर्दू साहित्य

 

गणपती बाप्पाला साजशृंगार करणारा नाशिकचा अस्लम


लातूरच्या मुस्लिम बांधवांनी घेतला ‘हा’ कौतुकास्पद निर्णय


गणेशोत्सवादरम्यान साताऱ्यातील मुस्लिम समाजाने घेतला मोठा निर्णय


विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी दिला मुस्लीम सहकाऱ्यांना पूजेचा मान


नाशिक येथे पार पडली हिंदू-मुस्लिम समुदायाची अमन परिषद

 


 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  - 

 

WhatsApp | Telegram | Facebook 

| Twitter | Instagram | YouTube