नाशिक येथे पार पडली हिंदू-मुस्लिम समुदायाची अमन परिषद

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
नाशिक : गणेशोत्सव महामंडळ समिती आणि सर्वपक्षीय नेत्यांकडून शहर-ए-खतीब हिसामुद्दिन खतीब यांचा सत्कार करताना
नाशिक : गणेशोत्सव महामंडळ समिती आणि सर्वपक्षीय नेत्यांकडून शहर-ए-खतीब हिसामुद्दिन खतीब यांचा सत्कार करताना

 

नाशिकच्या बडी दर्गा परिसरातील मदरसांमध्ये हिंदू मुस्लिम बांधवांची अमन परिषद संपन्न झाली. सामाजिक धार्मिक सलोखा कायम टिकून राहील, असा संदेश या परिषदेत देण्यात आला. यावेळी आगामी ईद-ए-मिलाद आणि गणेश विसर्जन मिरवणूकीबाबत शहर-ए-खतीब हिसामुद्दिन खतीब यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वांकडून स्वागत करण्यात आले.

ईद-ए-मिलाद आणि अनंत चतुर्थी (गणेश विसर्जन) दोन्ही सण एकाच दिवशी येत आहे. ईद-ए-मिलाद निमित्ताने दरवर्षी जुन्या नाशिक परिसरातून भव्य जुलूस काढण्यात येतो. त्यात हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी होतात. तर गणेश विसर्जनानिमित्त विसर्जन मिरवणुकीचेही मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. दोन्हीही मिरवणुकीचे स्वरूप भव्य असल्याने हिंदू मुस्लिम बांधव आणि पोलीस प्रशासन यांची भांबेरी उडते. त्यामुळे जुलूस एक दिवस पुढे लोटण्यात यावा, असे प्रयत्न सुरू होते. 

 
शहर-ए-खतीब हिसामुद्दिन खतीब तसेच मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवत जुलूस एक दिवस उशिरा अर्थात अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार (ता. २९) रोजी काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे समाजात मोठा आदर्श निर्माण झाला. शिवाय दोन समाजात तेढ निर्माण करू इच्छिणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम या निर्णयामुळे झाले. 

या आदर्श निर्णयाच्या निमित्ताने बडी दर्गा परिसरातील मदरसामध्ये अमन परिषद संपन्न झाली. सर्वपक्षीय नेते यानिमित्ताने एका व्यासपीठावर विराजमान झाले. आमदार देवयानी फरांदे, ज्येष्ठ नेते सुनील बागुल, माजी आमदार वसंत गीते, माजी उपमहापौर प्रथमेश गीते, माजी नगरसेवक राजेंद्र बागुल, सुधाकर बडगुजर हरिभाऊ लोणारे, गणेशोत्सव महामंडळ समितीचे अध्यक्ष समीर शेटे, अंकुश पवार यांनी उपस्थिती लावत शहर-ए-खतीब हिसामुद्दिन खतीब यांचे आभार व्यक्त केले. त्यांच्या निर्णयाचे स्वागत करत गणेशोत्सव महामंडळ समिती तसेच सर्व धर्मीय मुस्लिम बांधव नेते यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. समाजात नेहमी सामाजिक धार्मिक सलोखा नांदेल यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू. अमन परिषदेचा मुख्य हेतू पूर्ण करण्यास कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 
पावसाने अमन परिषदेचे स्वागत
धार्मिक सामाजिक सलोखा निर्माण होण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. अमन परिषद संपन्न होताच जोरदार पाऊस झाला. जणू पावसाने देखील या निर्णयासह अमन परिषदेचे स्वागत केले. अशी चर्चा यावेळी दिसून आली.

बडी दर्गा येथे प्रार्थना
अमन परिषदेस उपस्थित सर्वपक्षीय नेते, आमदार, हिंदू मुस्लिम बांधव यांनी बडी दर्गा येथे चादर शरीफ अर्पण केली. खतीब यांनी फतेहा पठन केले. अशाच पद्धतीने यापुढेही धार्मिक सामाजिक सलोखा नांदो यासाठी प्रार्थना करण्यात आली.
 
- युनुस शेख, नाशिक  
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या धार्मिक सौहार्दाच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻 

 

‘ईद ए मिलाद’चा जुलूस २९ सप्टेंबरला; वणीत मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय

 

अनंत चतुर्दशीनंतर निघणार ईद- ए- मिलादची मिरवणूक; मुस्लिम बांधवांकडून सलोख्याचा संदेश

 

जुन्नरला सामाजिक सलोख्याचे दर्शन; गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पैगंबर जयंतीची मिरवणूकीचा निर्णय

 

किन्हवलीतील मुस्लिम बांधवांचे एक पाऊल पुढे


अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी. मिरवणुकीबाबत मुस्लीम समाजाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र होतेय कौतुक

 

अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी आल्यामुळे सोलापूरच्या मुस्लीम समाजाने घेतला 'हा' निर्णय


अनंत चतुर्दशी अन् ईद एकाच दिवशी, मुस्लिम समुदायाने घेतला 'हा' मोठा निर्णय


नाशिकच्या चांदोरीतील मुस्लीम समाजाने घेतला 'हा' ऐतिहासिक निर्णय


हिंदू मुस्लीम धार्मिक सलोखा जपणारे भद्रकाली तलावडी मित्र मंडळ


मुस्लिम कारागिर साकारत आहेत नगरमधील श्री विशाल गणेश मंदिर


गणरायाच्या पूजेसाठी मुस्लीम बांधवांच्या दुकानातील हळदी-कुंकू


गणेशोत्सवात असे सहभागी होतात मुंबईकर मुस्लीम

 

धुळ्यातील रिजवानने बनवला इकोफ्रेंडली बाप्पा, मिळवले बक्षीस!

 

श्रीगणेशाला अभिवादन करणारे उर्दू साहित्य

 

गणपती बाप्पाला साजशृंगार करणारा नाशिकचा अस्लम



लातूरच्या मुस्लिम बांधवांनी घेतला ‘हा’ कौतुकास्पद निर्णय


गणेशोत्सवादरम्यान साताऱ्यातील मुस्लिम समाजाने घेतला मोठा निर्णय


 विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी दिला मुस्लीम सहकाऱ्यांना पूजेचा मान

 


 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  - 

 

WhatsApp | Telegram | Facebook 

| Twitter | Instagram | YouTube