कोल्हापुरात मशालींच्या उजेडात बाबूजमाल तालीम येथील नाल्या हैदर पंजा गुरुवारी रात्री भेटीसाठी बाहेर पडला
ताशांचा गजर व मशालीच्या उजेडात बाबूजमाल तालीम मंडळाचा नामशालींच्या उजेडात नाल्या हैदर भेटीचा सोहळा
रात्री उशिरापर्यंत शहरात पंजे भेटी : पावसातही उत्साहल्या हैदर पंजा भरपावसात भेटीला बाहेर पडला. दिवसभरात गुरुवारी पंजे चांद शिरदवाड, पन्हाळा येथे भेटीसाठी निघाले होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात रात्री उशिरापर्यंत भेटीचा सोहळा सुरू होता. शुक्रवारीही शहरातील विविध तालीम मंडळाचे पंजे भेटीसाठी निघणार आहेत.
गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास लवाजम्यासह धावत भेटीसाठी निघालेला पंजा ताराबाई रोडवरून जुना राजवाडा परिसरातील वाळव्याची स्वारी येथे पोहोचला. या भेटीनंतर बाराईमाम तालीम, छत्रपती शिवाजी चौकातील घुडणपीर दर्गा येथे भेटीनंतर रात्री उशिरा बाबूजमाल तालीम येथे आला. मशालींच्या प्रकाशात हा भेटीचा अनोखा सोहळा पाहण्यासाठी गर्दी झाली होती.
शिवाजी पेठेतील सत्यप्रकाश सेवा मंडळाचा झिमझिमसाहेब पंजा, महाराणा प्रताप चौकातील सत्यनारायण तालीम मंडळाचा मलिक रेहान मीरासाहेब पंजा हे पंजेही भेटीला निघाले होते. पारंपरिक वाद्याच्या गजरात भेटी सुरू होत्या. शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळाचे हुसेन साहेब, जमाल साहेब पंजे, सावर्डेकर यांचा चांदसाहेब १५ वर्षांनी भेटीला निघणार आहे. तसेच कदम बंधूंचा राजेबागस्वार पंजाही भेटीला बाहेर पडेल. पंचगंगा तालीम मंडळाचा चांदसाहेब वली पंजा २७वर्षांनी शनिवारी भेटीसाठी बाहेर पडणार आहे.