DAHI HANDI 2026: गोविंदांच्या उपचारासाठी मुंबई महापालिका सज्ज; महापालिका रुग्णालयांमध्ये १०० हून अधिक खाटा आरक्षित

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 d ago
दहीहंडीदरम्यान जखमी होणाऱ्या गोविंदांना मोफत उपचार मिळणार, प्रशासनाचे निर्देश
दहीहंडीदरम्यान जखमी होणाऱ्या गोविंदांना मोफत उपचार मिळणार, प्रशासनाचे निर्देश

 

मुंबई 

मुंबईत उद्या (शनिवार) होणाऱ्या दहीहंडीोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) गोविंदांच्या सुरक्षेची आणि उपचारांची जय्यत तयारी केली आहे. मानवी थर लावताना जखमी होणाऱ्या गोविंदांवर तातडीने आणि मोफत उपचार करता यावेत, यासाठी महापालिकेच्या सर्व प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये १०० हून अधिक खाटा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

दहीहंडीच्या दिवशी विविध गोविंदा पथके थर लावताना उंचावरून खाली पडून अनेकदा जखमी होतात. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वरमा यांनी महापालिका रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांना आणि वैद्यकीय अधीक्षकांना उपचाराबाबत सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. सायनमधील लोकमान्य टिळक रुग्णालय, परळचे केईएम रुग्णालय आणि मुंबई सेंट्रलच्या नायर रुग्णालयांसह १६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये विशेष बेड आरक्षित करण्यात आले आहेत.

वैद्यकीय साठा आणि यंत्रणा सज्ज

जखमी गोविंदांच्या उपचारासाठी रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधे, इंजेक्शन्स, सर्जिकल साहित्य आणि प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) चा साठा पर्याप्त प्रमाणात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच एक्स-रे आणि इतर वैद्यकीय उपकरणे पूर्णपणे कार्यरत ठेवण्यास सांगण्यात आले असून सर्व महापालिका रुग्णालयांमध्ये जखमी गोविंदांना पूर्णपणे मोफत वैद्यकीय उपचार दिले जातील, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



Latest News