आजकाल रोजची जिंदगी खबरा, डेडलाईन्स, लोकांचे सवाल आणि सततच्या धावपळीत जाते. दुनियेतल्या हलचाली पाहताना कधी मन बेकरार होतं, तर कधी कामाच्या तणावाने थकवा येतो. पण या सगळ्या गोंधळात माणसाला नेहमी सुकून देणारी आणि जमिनीवर ठेवणारी बात म्हणजे 'नमाज'. इस्लाममध्ये नमाज म्हणजे मजहबी सक्ती किंवा रिवायत नाही. ती इंसानची त्याच्या परवरदिगारशी होणारी थेट आणि खाजगी गुफ्तगू आहे.
माणसाला दुनियेच्या मोहातून बाहेर काढून पुन्हा स्वतःकडे आणि खुदाकडे वळवण्यासाठी दिवसातून पाच वेळा नमाज अदा करणं फर्ज मानलं गेलं आहे. पाच वक्तच्या नमाजचा हा सफर केवळ वेळेपुरता महदूद नाही. तो रुहानी सुकूनचा सफर आहे. तो नेमका कसा असतो, हे समजून घेणं जरुरी आहे.
१. फजर (Fajr): पहाटेचा सुकून आणि नवी इब्तिदा
रात्रीच्या गाढ झोपेनंतर, सूर्योदयापूर्वी सगळी दुनिया शांत असते. अशा वेळी मशिदीतून फजरच्या अझानचा आवाज येतो. या अझानमध्ये एक खास वाक्य असतं 'अस्सलातु खैरुम मिनन नौम' म्हणजेच 'झोपेपेक्षा नमाज बेहतर आहे'. उबदार अंथरुण सोडून, पाकीजा वझू करून इंसान इबादतसाठी उभा राहतो. ती खऱ्या अर्थाने नव्या आणि मुसबत दिवसाची इब्तिदा असते. फजरची नमाज इंसानला आळस झटकून कुदरतसोबत जागे व्हायला शिकवते.
.jpg)
२. झुहर (Zuhr): कामाच्या व्यापातून खुदाचा जिक्र
दुपारचा वक्त असतो. सुरज अगदी डोक्यावर आलेला असतो. इंसान पोटापाण्याच्या, मुलाझमत-कारोबारच्या धावपळीत गढून गेलेला असतो. अगदी त्याच वेळी 'झुहर'ची नमाज अदा केली जाते. ही नमाज इंसानला एक महत्त्वाची याद करून देते. ही दुनिया आणि ही कामं अहम आहेतच. पण हे सगळं देणाऱ्या परवरदिगारला विसरून चालणार नाही. कामातून काही वक्त बाजूला काढून, डोळे मिटून अल्लाहचे शुक्र अदा करण्याची ही वेळ असते. यातून उरलेल्या दिवसासाठी नवी ताकद मिळते.
.jpg)
३. असर (Asr): थकव्यावर रुहानी सुकून
दुपार टळून गेल्यानंतर आणि संध्याकाळ होण्यापूर्वीचा हा वक्त असतो. दिवसभराच्या मेहनतीने जिस्मला आणि मनाला थोडा थकवा आलेला असतो. अशा वेळी 'असर'ची नमाज अदा केली जाते. हा वक्त स्वतःला शांत करण्याचा आणि एकाग्र करण्याचा असतो. धावणाऱ्या दिवसाला थोडा ब्रेक देऊन, स्वतःच्या वजूदवर विचार करण्याची ही इबादत मनाला उभारी देते.
.jpg)
४. मगरिब (Maghrib): शुक्रगुजारीची शाम
क्षितिजावर सुरज ढळतो, आकाशात लालसर रंग पसरतो आणि रात्र हळूहळू तिची चाहूल देते. अगदी त्याचवक्ताला 'मगरिब'ची नमाज अदा केली जाते. रमजानच्या महिन्यात याच वक्ताला रोजा सोडला जातो, इफ्तार केला जातो. हा मुकाम जज्बाती असतो. दिवसभरात मिळालेल्या रिझकबद्दल, हिफाजतीबद्दल आणि चांगल्या सेहतबद्दल अल्लाहप्रती मनापासून शुक्रगुजारी व्यक्त करण्याची ही नमाज असते.
.jpg)
५. इशा (Isha): सुकूनच्या झोपेसाठी दिलाची पाकीजगी
रात्रीच्या सन्नाट्यात, झोपण्यापूर्वी अदा केली जाणारी दिवसातली अखेरची नमाज म्हणजे 'इशा'. दिवसभरात इंसानकडून कळत-नकळत अनेक गुनाह होतात. कोणाचं दिल दुखावलं जातं. इशाची नमाज म्हणजे या सर्व गुनाहांसाठी खुदाकडे मगफिरत मागण्याची आणि स्वतःचं दिल मुकम्मल साफ करण्याची वेळ असते. कोणतीही अढी किंवा गुस्सा मनात न ठेवता, सुकूनने आणि पाकीजा अंतःकरणाने झोपी जाण्यासाठी ही इबादत केली जाते.
.jpg)
नमाज: जिंदगीचा सलीका
नमाजकडे बारकाईने पाहताना, त्यात एक विलक्षण फलसफा दिसतो. नमाज इंसानला मजहबी तर बनवतेच पण त्याचसोबत ती वक्तची पाबंदी, जिस्मची पाकीजगी आणि शिस्त शिकवते. याहूनही अहम बात म्हणजे 'मसावात'. मशिदीत नमाजसाठी सगळे एकाच रांगेत उभे राहतात. तिथे कुणी अमीर नसतो, कुणी गरीब नसतो. कुणी मालक नसतो, कुणी गुलाम नसतो. अल्लाहाच्या दरबारात सगळे बरोबर असतात.
हेही वाचा: आसाममधील पिंगळेश्वर गावात जतन केलेले शेकडो वर्षे जुने हस्तलिखित कुराण
दिवसातले हे काही मुकाम इंसानला या भौतिक दुनियेपासून दूर नेतात आणि त्याला त्याच्या खऱ्या वजूदची ओळख करून देतात. धावपळीच्या या युगात, नमाज हा दिलाला सुकून देणारा आणि जिंदगीला अर्थ देणारा खुबसुरत मुकाम आहे.