Cyclone Arnab Update: अर्नब वादळ धडकणार किनारपट्टीवर; आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये हायअलर्ट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 59 m ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले 'अर्नब' (Cyclone Arnab) तीव्र चक्रीवादळ अधिक भयानक रूप धारण करत वेगाने किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. येत्या बुधवारी (२८ ऑक्टोबर) सकाळी हे वादळ आंध्र प्रदेश आणि यानम किनारपट्टीला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली असून समुद्रात मासेमारी करण्यास सक्त बंदी घालण्यात आली आहे. तसेच जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे.

केंद्राकडून उच्चस्तरीय बैठक आणि यंत्रणा सज्ज
नवी दिल्लीत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीने (NCMC) चक्रीवादळाच्या तयारीचा आढावा घेतला. मंत्रिमंडळ सचिव टी. व्ही. सोमनाथन यांनी आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड आणि पुद्दुचेरीसह उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवत सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. कोणतीही जीवितहानी होऊ नये आणि पायाभूत सुविधांचे ε ε ε नुकसान टाळावे, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. राष्ट्रीय आपत्ती दल (NDRF) आणि लष्कराच्या तुकड्या, तसेच नौदल आणि तटरक्षक दल (Coast Guard) पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आले आहेत.

ओडिशा आणि आंध्र प्रदेशमधील प्रतिबंधात्मक उपाय
ओडिशा सरकारने गंजम, गजपती, रायगडा, मल्कानगिरी, कोरपुट आणि नवरंगपूर या दक्षिण जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या बंद ठेवल्या आहेत. किनारपट्टी भागातील नागरिकांना सुरक्षित स्थలాंतरित करण्याचे काम सुरू असून गर्भवती महिलांना आधीच आरोग्य केंद्रात हलवण्यात आले आहे.

आंध्र प्रदेश सरकारने मदत कार्यासाठी जिल्ह्यांना निधी जाहीर केला असून मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी अधिकाऱ्यांबरोबर उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बापाटा, विशाखापट्टनम, काकीनाडा आणि कृष्ण जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या पथकांना तैनात करण्यात आले आहे. तसेच पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांतही पावसाचा इशारा देण्यात आला असून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.