संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा सिक्कीम दौरा; शेरेथांग युद्ध स्मारकावर शूर जवानांना श्रद्धांजली

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 11 h ago
सिक्कीम: राजनाथ सिंह यांनी शेरेथांग युद्ध स्मारकावर वाहिली श्रद्धांजली
सिक्कीम: राजनाथ सिंह यांनी शेरेथांग युद्ध स्मारकावर वाहिली श्रद्धांजली

 

गँगटॉक 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी सिक्कीममधील नथू ला नजीक असलेल्या शेरेथांग येथे भेट देऊन युद्ध स्मारकावर शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. पूर्व सिक्कीममधील या संवेदनशील सीमावर्ती भागात पोहोचल्यावर संरक्षण मंत्र्यांचे स्थानिक प्रशासन आणि भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वागत केले.

शेरेथांग युद्ध स्मारकावर शूरवीरांना नमन

पूर्व सिक्कीममधील शेरेथांग युद्ध स्मारकाला भेट देऊन राजनाथ सिंह यांनी देशाच्या संप्रभुतेचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अमर जवानांच्या शौर्याला आणि धैर्याला नमन केले. गँगटॉकचे जिल्हाधिकारी रोहन आगावणे, वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ. त्सेरिंग नामग्याल ग्यात्सो आणि गृह विभागाचे संयुक्त सचिव जॉन गुरुंग यांच्यासह लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेरेथांग येथे संरक्षण मंत्र्यांचे स्वागत केले.

सीमावर्ती भागात तैनात जवानांशी संवाद आणि बाबा हरभजन सिंह मंदिरात दर्शन

या दौऱ्यादरम्यान संरक्षण मंत्र्यांनी अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक हवामानात सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांशी संवाद साधला. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी जवान करत असलेल्या अखंड सेवेचे आणि निष्ठेचे त्यांनी मनापासून कौतुक केले. याशिवाय, राजनाथ सिंह यांनी सैन्य दलांमध्ये अथांग श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध 'बाबा हरभजन सिंह मंदिरा'ला भेट देऊन नतमस्तक होत प्रार्थना केली.