'हल्ल्यात मला मरण आलं असतं तर बरं झालं असतं'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 21 h ago
कुख्यात दहशतवादी मौलाना मसूद अजहर
कुख्यात दहशतवादी मौलाना मसूद अजहर

 

पहलगाम हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून भारताने आज पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केली आहे. यावेळी दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांवर हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यात ८० ते ९० दहशतवादी ठार झाल्याचं सांगण्यात येत आहे. अशातच या हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबांतील सदस्यांचा मृत्यू झाल्याचीदेखील माहिती पुढे आली आहे.

मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्य ठार
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ जणांचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यामध्ये मसूद अझहरची बहीण, त्याचा जावाई आणि भावाच्या मुलाचा समावेश आहे. याशिवाय भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगर या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

कोण आहे मसूद अझहर?
मसूद अझहर हा भारताचा मोस्ट वाँटेट दहशतवादी आहे. तो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा संस्थापकही आहे. १९९४ मध्ये त्याला काश्मीरमध्ये अटक करण्यात आली होती. मात्र, १९९९ मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या IC-814 विमान अपहरण प्रकरणात त्याची सुटका करण्यात आली होती. पुढे मसूद अझहरने वर्ष २००० मध्ये जैश-ए-मोहम्मदची स्थापना केली होती.

हल्ल्यानंतर काय म्हणाला मसूद अझहर?
या घटनेनंतर आता अझहरची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. संपूर्ण कुटुंब संपल्यानंतर मसूद अजहर अक्षरश: रडला. या हल्ल्यात मीसुद्धा मेलो असतो तर बरं झालं असतं, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

या हल्ल्यांत अझहरचा समावेश
भारतात २००१ मध्ये झालेला संसदेवरील हल्ला, २०१६ मध्ये झालेला पठानकोट हल्ला तसेच २०१९ मध्ये झालेला पुलवामा हल्ला याच जैश-ए-मोहम्मद संघटनेनं केलं होता. १ मे २०१९ रोजी संयुक्त राष्ट्राने मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले होतं.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत अझहरवर हल्ला
दरम्यान, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आता भारतीय हवाई दलाने बहावलपूर येथील त्याच्या तळावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील सदस्य ठार झाले आहेत. तर त्याचा भाऊ रऊफ असगर गंभीर जखमी झाला आहे.