पंतप्रधान मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात नवी दिल्लीत महत्त्वाची द्विपक्षीय चर्चा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन

 

नवी दिल्ली 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा केली. ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात संरक्षण, ऊर्जा, आणि २०२३० पर्यंत १०० अब्ज डॉलर द्विपक्षीय व्यापाराचे लक्ष्य गाठण्याबाबत सविस्तर मंथन झाले.

संरक्षण आणि ऊर्जा सहकार्यावर भर

दोन्ही नेत्यांच्या बैठकीत द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी मजबूत करण्यावर भर देण्यात आला. रशियन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचे आधुनिकीकरण, एस-४०० यंत्रणेचा पुरवठा आणि Su-57 लढाऊ विमानांच्या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. तसेच भारतामध्ये नवीन अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबत आणि ऊर्जा क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवण्यात आली.

युक्रेन संघर्ष आणि जागतिक घडामोडी

या बैठकीत युक्रेन युद्धाबाबत आणि शांततेच्या मार्गावरही चर्चा झाली. याआधी बिश्केक येथे झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी युद्धाचा लवकरात लवकर अंत व्हावा आणि युद्धापासून संवादाकडे वळावे, असे आवाहन केले होते. याशिवाय औद्योगिक सहकार्य, रेकॉर्ड शिपमेंट, रेल्वे क्षेत्र, आणि खनिज सहकार्यावरही चर्चा झाली.



Latest News