पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्जेंटिनाच्या दौऱ्यावर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 15 d ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अर्जेंटिना दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अर्जेंटिना दौरा

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगोचा दौरा पूर्ण केला आहे. ४ जुलैला पोर्ट ऑफ स्पेन येथून ते अर्जेंटिनाच्या ब्युनस आयर्सला रवाना झाले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भेटीसाठी ब्युनस आयर्सला पोहोचले आहेत. या भेटीत ते अर्जेंटिनाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांमधील चालू सहकार्याचा आढावा घेतील. प्रमुख क्षेत्रांत द्विपक्षीय भागीदारी वाढवण्याचे मार्ग वाढवणार आहेत.  

पंतप्रधान मोदी ४ जुलैला सायंकाळी (स्थानिक वेळेनुसार) ब्युनस आयर्सला पोहोचले. एझीझा आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे औपचारिक स्वागत झाले.  ५७ वर्षांनंतर भारताची पंतप्रधान स्तरावरील ही पहिली द्विपक्षीय भेट आहे. पंतप्रधान म्हणून मोदींची अर्जेंटिनाला ही दुसरी भेट आहे. यापूर्वी २०१८ मध्ये ते जी20 परिषदेसाठी आले होते.  हा त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्याचा तिसरा टप्पा आहे.  पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष हाविएर मिलेई यांच्याशी सविस्तर चर्चा करतील. 

भारत-अर्जेंटिना भागीदारीला संरक्षण, शेती, खाणकाम, तेल आणि वायू, ऊर्जा, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रांत पुढे नेण्यावर भर असेल. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली.  “पंतप्रधानांची ही द्विपक्षीय भेट भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील बहुआयामी सामरिक भागीदारीला अधिक गहरी करेल,” असे मंत्रालयाने निवेदनात म्हटले.  

दौऱ्यापूर्वी पंतप्रधानांनी सांगितलं की, अर्जेंटिना लॅटिन अमेरिकेतील महत्त्वाचा आर्थिक भागीदार आहे. जी20 मध्ये जवळचा सहकारी आहे. ते राष्ट्राध्यक्ष हाविएर मिलेई यांची भेट घेण्यास उत्सुक आहेत. गेल्या वर्षी त्यांची भेट झाली होती.  “आम्ही शेती, महत्त्वाची खनिजं, ऊर्जा, व्यापार, पर्यटन, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक क्षेत्रांत परस्पर फायदेशीर सहकार्य वाढवण्यावर लक्ष केंद्रित करू,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.  

पंतप्रधान मोदींनी ब्युनस आयर्सला पोहोचण्यापूर्वी त्रिनिदाद आणि टोबॅगोचा दोन दिवसांचा दौरा पूर्ण केला. त्या दौऱ्यात दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी सहा करार केले. पंतप्रधानांना ‘द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो’ हा सन्मान देण्यात आला. कॅरिबियन देशाचा हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. ते हा सन्मान मिळवणारे पहिले परदेशी नेते ठरले.  दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी ब्राझीलला जाणार आहेत. तिथे ते 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहतील. त्यानंतर त्यांची राजकीय भेट होईल. दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात ते नामिबियाला भेट देतील.