पंतप्रधान नरेंद्र मोदी'आयएनएस विक्रांत' या युद्धनौकेवर दिवाळी साजरी करतानाचे क्षण
"जेव्हा शत्रू समोर असतो आणि युद्ध जवळ येते, तेव्हा स्वबळावर लढण्याची ताकद असलेल्या पक्षाला नेहमीच फायदा होतो. सशस्त्र दलांना बळकट करण्यासाठी आत्मनिर्भरता आवश्यक असून, भारताची त्या दिशेने ठाम वाटचाल सुरू आहे, " असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. 'आयएनएस विक्रांत' या युद्धनौकेवर दिवाळी साजरी करताना पंतप्रधान मोदी यांनी नौसैनिकांना मार्गदर्शन केले. भारत आता नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे ते म्हणाले.
गोवा येथे 'आयएनएस विक्रांत 'वर व्यत्तित केलेल्या त्यांच्या रात्रीची आठवण सांगताना पंतप्रधान म्हणाले की, "हा अनुभव शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. अथांग समुद्रातील रात्र आणि सूर्योदय पाहण्याच्या अनुभवामुळे ही दिवाळी संस्मरणीय बनली आहे. विक्रांत ही केवळ एक युद्धनौका नाही; ती २१व्या शतकातील भारताच्या कठोर परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि वचनबद्धतेची साक्ष आहे. ज्या दिवशी देशाला स्वदेशी बनावटीचे आयएनएस विक्रांत मिळाले, त्याच दिवशी नौदलाने वसाहतवादी वारशाच्या प्रमुख प्रतिकांचा त्याग केला होता. नौदलाने स्वीकारलेला नवीन ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून साकारला होता."
'आयएनएस विक्रांत' आज 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेड इन इंडिया' अर्थात 'स्वदेशी'चे एक शक्तिशाली प्रतीक म्हणून उभे आहे, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले. काही महिन्यांपूर्वीच 'विक्रांत 'च्या नावानेच पाकिस्तानची झोप उडाली होती याची त्यांनी आठवण करून दिली, 'आयएनएस विक्रांत' ही अशी युद्धनौका आहे जिचे केवळ नावच शत्रूची ममेड जिरविण्यासाठी पुरेसे आहे असे ते म्हणाले. तिन्ही दलांमधील अभूतपूर्व समन्वय यामुळे 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान पाकिस्तानला शरण यावे लागले, असेही पंतप्रधान म्हणाले. सशस्त्र दलांना बळकट करण्यासाठी आत्मनिर्भरता आवश्यक आहे. गेल्या दशकात, भारतीय लष्कराने आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने प्रगती केली आहे. बहुतेक आवश्यक उपकरणे आता देशांतर्गत तैयार करली जात आहेताता देशातर्गत गेल्या दहा-अकरा वर्षांत, भारताचे संरक्षण उत्पादन तिप्पट झाले आहे. भारतीय जहाजबांधणी कारखान्यांकडून नौदलाला ४० हून अधिक स्वदेशी युद्धनौका आणि पाणबुड्या मिळाल्या अशी माहिती मोदी यांनी दिली. सध्या सरासरी दर ४० दिवसांनी एक नवी स्वदेशी युद्धनौका किंवा पाणबुडी नौदलात समाविष्ट केली जात आहे, असे ते पुढे म्हणाले.
सिद्ध केली क्षमता
'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान 'ब्रह्मोस' आणि 'आकाश' सारख्या क्षेपणास्त्रांनी त्यांची क्षमता सिद्ध केली आहे. जगभरातील अनेक देश आता ही क्षेपणास्त्रे खरेदी करण्यास इच्छुक आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. गेल्या दशकात भारताची संरक्षण निर्यात तौस पटीने वाढली असून जगातील आघाडीच्या संरक्षण निर्यातदारांमध्ये गणले जाणे हे भारताचे ध्येय आहे, असे मोदी यांनी सांगितले. भारतीय नौदल भारतीय बेटांचे संरक्षण आणि अखंडता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, यावर पंतप्रधानांनी जोर दिला. भारताच्या सशस्त्र दलांनी वेळोवेळी परदेशात अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मोहिमा राबवल्या आहेत, असे मोदी यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी भारतीय तटरक्षक दल बजावत असलेल्या भूमिकेचीही प्रशंसा केली.
नक्षलवाद्यांचे उच्चाटन
भारत आता नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त होण्याच्या मार्गावर आहे, असे मोदी म्हणाले. २०२५ पूर्वी, सुमारे १२५ जिल्हे नक्षलग्रस्त होते; आज ही संख्या अकरावर आली आहे. केवळ तीनच जिल्ह्यांत त्याचा अधिक प्रभाव आहे. शंभराहून अधिक जिल्हे आता नक्षलवादाच्या छायेतून पूर्णपणे बाहेर पडले आहेत आणि पहिल्यांदाच मोकळा श्वास घेत आहेत. जीएसटी बचत उत्सवादरम्यान या भागात विक्रमी विक्री आणि खरेदी झालेली दिसून येत आहे, असे त्यांनी सांगितले.