PM Modi Donald Trump Call: पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात व्यापार व सुरक्षेवर चर्चा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 25 m ago
प्रातिनिधिक इमेज
प्रातिनिधिक इमेज

 

नवी दिल्ली 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यादरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांचा सर्वसमावेशक आढावा घेतला असून व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि धोरणात्मक सहकार्याविषयी सविस्तर चर्चा केली.

व्यापार आणि रशिया-इराण निर्बंध कायद्यावर चर्चा

अमेरिका सरकारने अलीकडेच लागू केलेल्या 'रशिया आणि इराण निर्बंध कायदा २०२६' (SRIA) च्या पार्श्वभूमीवर ही चर्चा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या कायद्यामुळे रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर १०० टक्क्यांपर्यंत शुल्क आकारण्याची तरतूद आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अलीकडेच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबतच्या बैठकीत याविषयी भारताची भूमिका स्पष्ट केली होती. दोन्ही नेत्यांनी जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवरही विचारविनिमय केला.

द्विपक्षीय व्यापार कराराला गती देण्याचे प्रयत्न

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल सध्या अमेरिका दौऱ्यावर असून, भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराच्या (BTA) अंमलबजावणीसाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांनी भारत-अमेरिका सर्वसमावेशक जागतिक सामरिक भागीदारी अधिक दृढ करण्यावर भर दिला असून आगामी काळातही संपर्कात राहण्याचे मान्य केले आहे.