नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी नवी दिल्लीत उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा केली. ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने भारतात आलेल्या पुतिन यांच्यासोबतच्या या बैठकीत काळ्या समुद्रातील भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा गांभीर्याने उपस्थित करण्यात आला. तसेच २०२३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.
युक्रेन संघर्षाबाबत बोलताना पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच एकमेव मार्ग असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही शांतता प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी भारत पूर्णपणे तयार असल्याचे त्यांनी पुतिन यांना सांगितले. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान काळ्या समुद्रात ५ भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने हा विषय अत्यंत तीव्रतेने दोन्ही बाजूंमधे उपस्थित केला आहे.
दोनो नेत्यांच्या या ४५ मिनिटांहून अधिक चाललेल्या बैठकीत संरक्षण, ऊर्जा, अणुऊर्जा, खतांचा पुरवठा आणि नागरिकांमधील परस्पर संबंधांवर सविस्तर चर्चा झाली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी रशियामध्ये होणाऱ्या २४ व्या वार्षिक शिखर परिषदेचे पुतिन यांचे आमंत्रण स्वीकारले आहे. दोन्ही नेत्यांनी भारत मंडपम येथील 'इनोप्रॉम इंडिया' प्रदर्शनालाही भेट दिली.