"दहशतवाद थांबेपर्यंत सिंधू करारावर चर्चा नाही"

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 23 h ago
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

 

"सिंधू पाणीवाटप करार सध्या स्थगित करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून सीमेपलीकडील दहशतवाद दृष्यस्वरूपात आणि विश्वासार्हपणे थांबविला जात नाही तोपर्यंत त्यावर चर्चा होणार नाही," असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज स्पष्ट केले, तसेच पाकिस्तानशी भारताचे संबंध हे पूर्णतः द्विपक्षीय स्वरूपाचेच असतील, असे सांगताना पाकिस्तानशी चर्चा केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच होऊ शकते आणि भारत त्यासाठी तयार आहे, असेही पसाष्ट्रमंत्र्यांनी ठणकावून सांगितले. 

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने स्थगित केलेल्या सिंधू पाणी वाटप करारावर चर्चा सुरू करण्याची मागणी पाकिस्तानने केली आहे. त्यापाश्र्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारताची भूमिका मांडताना या मुद्दधावर तडजोड करण्याचा भारताचा मानस नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. वित्तीय होंडुरासच्या वकिलातीच्या उद्‌घाटनानंतर माध्यमांशी बोलताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाकिस्तानदरम्यानच्या संघर्षविरामामधील अमेरिकेच्या मध्यस्थाची भूमिका यावर प्रथमच जाहीर भाष्य केले जाकर म्हणाले, की पाकिस्तानसोबतचे संबंध आणिधरताची भूमिका हे पूर्णपणे प्रषिक्षीय स्वरूपाचेच असेल. 

गेल्या अनेक वर्षापासून यावर राष्ट्रीय सहमती आहे आणि त्यामध्ये कोणताही बदल झाला दाही. जपशंकर म्हणाले, की पाकिस्तानसोबाची कोणतीही चर्चा फक्त दहशतवादाबरण देईल, असे पंतप्रधानांनी आधीच म्हटले आहे. पाकिस्तानकडे दहशतवाद्यांची यादी आहे या दहाद्यांना भारताकडे सोपवावे लागेल आणि दहशतवाद्यांना दिल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधाहों बंद कराव्या लागतील. पाकिस्तानला नेमके काय करायचे आहे हे त्यांना माहिती आहे. भारत पाकिस्तानशी दहशतवादासंदर्भात चर्चा करण्यास तयार आहे आणि अशाच चर्चा शक्य आहेत. 
 
काश्मीरवर पाकिततानाशी होणारी चर्चा ही केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच असेल, असे ठणकावून सांगताना जयशंकर महामाले, की पाकिस्तानने बेकायदा ताब्यात घेतलेल्या भारतीय भूभागाची (पाकव्याप्त काश्मीर) मुक्तता हा एकमेव मुदा पाकिस्तानशी काश्मीरसंदर्भात चर्चेचा आहे. या चर्चेसाठी भारत सज्ज आहे. 

'ऑपरेशन सिंदूर'वर भारताला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळाला असल्याचे सांगताना जयशंकर म्हणाले, की भारताला व्यापक आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळाला आहे. गुन्हेगारांना जबाबदार धरले जावे आणि शासन व्हावे असा संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीचा ठरावही होता. भारताने ७ मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून दहशतवाद्यांना जवाबदार धरून कारवाई केली आहे. ठत्युवाँ, होंडुरासच्या वकिलातीच्या अन्नावरणाप्रसंगी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याबद्दल होंडुरासचे आभार मानले आणि दहशत्रावादाच्या सर्व प्रकारांना विरोध करण्याच्या होंडुरासच्या सार्वजनिक बांधिलकीची प्रशंसाही केली. 

सिंधू करारावरून पाकची भारतासोबत चर्चेची तयारी 
नवी दिल्ली: भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित केल्यानंतर आता पाकिस्तानने या मुख्यावरून भारतासोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानचे जलसंपदा सचिव सय्यद अली मुर्तझा यांनी भारत सरकारच्या करार निलंबनासंदर्भातील औपचारिक अधिसूचनेला उत्तर दिले आहे. 

भारतीय समकक्ष देबाश्री मुखजों यांना लिहिलेल्या पत्रात, मुर्तीझा यांनी भारताने उपस्थित केलेल्या विशिष्ट आक्षेपांवर चर्चा करण्यास पाकिस्तानच्या सरकारची वपारी असल्याचे म्हटले आहे. करारामध्ये बाहेर पहण्याचे कोणतेही कलम नसल्याचे नमूद करून त्यांनी भारताच्या निर्णयाच्या कायदेशीर आधारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अर्थात या घडामोडीनंतर भारत निर्णयावर ठाम असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, जलसक्ती मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी या घडामोडींवर टिपणी करण्यास नकार दिला. कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताची भूमिका बदलण्याची शक्यता नाही, असेही मंत्रालयातील सूत्रांनी म्हटले आहे.