दिल्लीत काँग्रेसचे आंदोलन; राजीव चौक, सेंट्रल सेक्रेटरीटसह ६ मेट्रो स्टेशन बंद

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 55 m ago
दिल्ली मेट्रोचे ६ महत्त्वाचे स्टेशन बंद
दिल्ली मेट्रोचे ६ महत्त्वाचे स्टेशन बंद

 

नवी दिल्ली 

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रोने मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आज (सोमवारी) दुपारी ४ वाजेपर्यंत दिल्लीतील सहा प्रमुख मेट्रो स्थानकांचे प्रवेश व बाहेर पडण्याचे मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत.

६ प्रमुख मेट्रो स्थानके बंद

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (DMRC) दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल सेक्रेटरीट, राजीव चौक, पटेल चौक, जनपथ, मंदी हाऊस आणि बारखंबा रोड या सहा मेट्रो स्थानकांवरील प्रवेश आणि बाहेर पडण्याची सुविधा बंद राहणार आहे. 'मत चोरी'च्या आरोपावरून काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात हे आंदोलन पुकारले आहे.

संबंधित सर्व बाधित स्थानकांवर मेट्रो बदलण्याची (इन्टरचेंज) सुविधा मात्र सुरू राहणार असल्याचे डीएमआरसीने स्पष्ट केले आहे. सुरक्षा यंत्रणांच्या आढाव्यानंतर परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतला जाईल आणि त्याविषयीची माहिती दिली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.