मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बांधणी; झिशान सिद्दीकी यांच्या पदग्रहण सोहळ्याला दिग्गज नेत्यांची उपस्थिती

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 13 m ago
झिशान सिद्दीकी यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला
झिशान सिद्दीकी यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला

 

मुंबई 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधान परिषद सदस्य झिशान सिद्दीकी यांनी बुधवारी पक्षाच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. यासोबतच सूरज चव्हाण यांची पक्षाच्या महाराष्ट्र मुख्य प्रवक्तेपदी आणि सिद्धार्थ कांबळे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिग्गज नेत्यांची उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा पार पडला. दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र असलेल्या झिशान सिद्दीकी यांच्याकडे मुंबईत पक्ष संघटना मजबूत करण्याची आणि पक्षाचा विस्तार करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक, माजी मंत्री धनंजय मुंडे, पक्षाचे कोषाध्यक्ष व आमदार शिवाजीराव गर्जे तसेच आमदार सना मलिक-शेख आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.



Latest News