महात्मा गांधी जयंती 2026: पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली, 'विकसित भारत'च्या संकल्पावर भर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 42 m ago
महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

 

नवी दिल्ली 

महात्मा गांधींच्या १५७ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी त्यांना आदरांजली वाहिली. बापूंचे विचार हे नेहमीच एका चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी आणि 'विकसित भारत'च्या स्वप्नासाठी मार्गदर्शक ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्य आणि अहिंसेचा मार्ग

पंतप्रधान मोदींनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे महात्मा गांधींच्या कार्याचे स्मरण केले. बापूंचे संपूर्ण आयुष्य हे सत्य, अहिंसा, करुणा आणि सेवेचे प्रतीक राहिले आहे, जे प्रत्येक युगात मानवतेला मार्गदर्शन करत राहील, असे मोदींनी म्हटले. सत्तेपासून दूर राहूनही महात्मा गांधी आजही कोटी लोकांच्या हृदयात वसलेले आहेत, असे त्यांनी नमूद केले.

'स्वदेशी' आणि खादीचा संदेश

महात्मा गांधींनी नेहमीच सर्वांना 'स्वदेशी'चा स्वीकार करण्यासाठी प्रोत्साहित केले होते, असे सांगत पंतप्रधानांनी खादीच्या महत्त्वावर भर दिला. प्रत्येकाने किमान एक खादीचे उत्पादन खरेदी करून ते स्वदेशी असल्याचा अभिमान बाळगावा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी गांधी जयंतीच्या निमित्ताने देशवासियांना केले आहे.