CJP PROTEST: सोनम वांगचुक यांचे उपोषण सुटण्याची शक्यता: विद्यार्थ्यांवर कारवाई न केल्यास उपोषण सोडणार असल्याची घोषणा.

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 d ago
२५ दिवसांच्या उपोषणादरम्यान ११ किलो वजन घटलेले पर्यावरणवादी सोनम वांगचुक
२५ दिवसांच्या उपोषणादरम्यान ११ किलो वजन घटलेले पर्यावरणवादी सोनम वांगचुक

 

नवी दिल्ली

पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी बुधवारी स्पष्ट केले की, जर केंद्र सरकारने आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही बळाचा वापर केला जाणार नाही आणि त्यांच्यावर कोणतेही गुन्हे (FIR) किंवा दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, अशी हमी दिली तर ते आपले आमरण उपोषण सोडण्यास तयार आहेत. उपोषणादरम्यान त्यांचे सुमारे ११ किलो वजन घटले असून, त्यांना आता पुन्हा आपल्या कामावर परत जायचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयातून जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात प्रकृती खालावलेली असतानाही वांगचुक म्हणाले, "मी अजूनही जिवंत आहे. माझ्या उपोषणाचा हा २५ वा दिवस आहे. माझे सुमारे ११ किलो वजन कमी झाले आहे. स्नायू बळावले आहेत, पण मी ठीक आहे. मला माझे काम सुरू करायचे आहे, परंतु मी सरकारला विनंती करतो की विद्यार्थ्यांवर पुन्हा बळ वापरू नका आणि कोणतेही एफआयआर दाखल करू नका. मला त्याबद्दल हमी हवी आहे. जर ती हमी मिळाली, तर मी आजच उपोषण सोडवीन. जर हमी मिळाली नाही, तर मला उपोषण सुरू ठेवावे लागेल."

सोमवारी कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आयोजित केलेल्या 'चलो संसदे' मोर्चादरम्यान आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईनंतर आपण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा हल्ला क्रूर होता, असे सांगत भडकवले गेले तरीही दगडफेक न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संयमाचे त्यांनी कौतुक केले. दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि ६५ खासदारांनी आपल्याला उपोषण सोडण्याची विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेन्द्र सिंह यांना लिहिलेल्या पत्रात वांगचुक यांनी नमूद केले की, मंगळवारी रात्री रुग्णालयात झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी NEET पेपर लीक प्रकरणातील मृतांच्या कुटुंबीयांना योग्य भरपाई देण्याबाबत आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर संसदेत अर्थपूर्ण चर्चा घडवून आणण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. विरोधकांच्या शिष्टमंडळानेही त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.