Delhi Bus Gang Rape Case: सर्वोच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी घेतली गंभीर दखल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 28 m ago
दिल्ली-एनसीआरमधील धावत्या बसमधील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली स्वतःहून दखल.
दिल्ली-एनसीआरमधील धावत्या बसमधील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली स्वतःहून दखल.

 

नवी दिल्ली

दिल्ली-एनसीआरमधील धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांच्या प्रणालीगत अपयशामुळे अशा घटना घडत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान २०१२ च्या निर्भया प्रकरणाची वेदनादायक आठवण करून दिली. सार्वजनिक ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था, सीसीटीव्ही निगरानी आणि प्रशासकीय सुविधांच्या अभावामुळे उद्याने आणि बससारखी ठिकाणे धोक्याची बनत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

ग्रेटर नोएडा येथे स्लीपर बसमध्ये चढलेल्या १६ वर्षीय मुलीवर बसचा कंडक्टर आणि चालकाने चालत्या बसमध्ये बलात्कार केला आणि जुन्या दिल्लीतील काश्मिरी गेटजवळ तिला सोडून दिले होते. ४ ऑगस्ट रोजी घडलेल्या या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. सार्वजनिक सुरक्षेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने कडक भूमिका घेत प्रशासनाला फटकारले आहे.