ICC RANKING: अक्षर पटेलची थेट टॉप-१० मध्ये एन्ट्री, इंग्लंडविरुद्धच्या कामगिरीचे फळ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 16 h ago
ऑलराऊंडर अक्षर पटेल
ऑलराऊंडर अक्षर पटेल

 

दुबई

भारतीय अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने आयसीसीच्या ताज्या वनडे रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम येथे झालेल्या पहिल्या सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अक्षर पटेलने वनडे ऑलराऊंडर रँकिंगमध्ये पहिल्या १० मध्ये स्थान मिळवले आहे. तो आता तीन स्थानांची सुधारणा करत नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

अक्षर पटेलची ऑलराऊंडर कामगिरी

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेलने गोलंदाजीत चार बळी टिपले, तर फलंदाजीत ५२ चेंडूत ५७ धावांची खेळी करत भारताच्या सहा गडी राखून मिळवलेल्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या कामगिरीमुळे त्याच्या रँकिंगमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. फलंदाजीच्या क्रमवारीत तो १८ स्थानांच्या फायद्यासह ७३ व्या, तर गोलंदाजीच्या क्रमवारीत दोन स्थानांच्या फायद्यासह ४२ व्या स्थानी पोहोचला आहे.

इतर भारतीय खेळाडूंची प्रगती

भारतीय संघातील पुनरागमन करणाऱ्या शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कामगिरीचाही रँकिंगवर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. शुभमन गिलने ७५ चेंडूत ८० धावांची खेळी केल्यामुळे त्याच्या रेटिंग पॉइंट्समध्ये १२ गुणांची वाढ झाली आहे. तो आता वनडे फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या डॅरिल मिचेलपासून केवळ ११ गुणांच्या अंतरावर आहे.

तसेच, जसप्रीत बुमराहने गोलंदाजी रँकिंगमध्ये पुन्हा एकदा २४ व्या स्थानी झेप घेतली आहे, तर वॉशिंग्टन सुंदरने फलंदाजी आणि अष्टपैलू रँकिंगमध्ये अनुक्रमे १७७ व्या आणि ५५ व्या क्रमांकावर मजल मारली आहे. इंग्लंडचा फलंदाज जो रूट यानेही रँकिंगमध्ये सुधारणा करत १२ व्या स्थानी झेप घेतली आहे.