Asian Games Shooting: महिला नेमबाजीत भारताचा डंका; ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्य पदकाची कमाई

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 48 m ago
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावणारा भारताचा महिला नेमबाज संघ
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावणारा भारताचा महिला नेमबाज संघ

 

नागोया 

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला नेमबाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत ट्रॅप सांघिक (Trap Team) प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे. नीरू धंडा, आशिमा अहलावत आणि मनीषा कीर या त्रिकुटाने एकत्रितपणे ३२८ गुणांची कमाई करत हे यश मिळवले. या स्पर्धेत चीनने ३४६ गुणांसह सुवर्णपदक पटकावले, तर कुवेतच्या संघाने कांस्यपदक आपल्या नावावर केले.

नीरू धंडाची वैयक्तिक अंतिम फेरीत धडक

सांघिक यशाबरोबरच वैयक्तिक प्रकारातही भारताच्या महिला नेमबाजांनी चमकदार कामगिरी केली. नीरू धंडा हिने ११७ ते ११८ गुणांची कमाई करत कतारच्या रे बासिल हिच्यासोबत संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले आणि अंतिम फेरीत धडक मारली. स्पर्धा विक्रमाची नोंद करत तिने ही मजल मारली आहे. दुसरीकडे, आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांनी वैयक्तिक प्रकारात अनुक्रमे सोळावे आणि तेविसावे स्थान पटकावले. भारतीय नेमबाजांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान पुन्हा एकदा उंचावली आहे.