विराट क्रिकेटचा खरा बादशाह, पाकिस्तानच्या मोहम्मद अमीरने केली प्रशंसा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 6 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

आयपीएलमध्ये चार वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर सहावे शतक झळकावणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विराट कोहलीने काही दिवसांनंतर रविवारी पुन्हा शतक झळकावले. विराटचे आयपीएल कारकिर्दीतील हे सातवे शतक होते. आरसीबीच्या होम ग्राउंड चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने हे शतक झळकावले.

 

विराटने ६१ चेंडूत नाबाद १०१ धावांची खेळी केली. या शतकासह विराटने ख्रिस गेलचा आयपीएलमध्ये सर्वाधिक सहा शतकांचा विक्रम मोडला. या शतकानंतर विराटवर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, तर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरनेही ट्विट करत अभिनंदन केले.

 

आमिरने ट्विटरवर लिहिले की, 'क्रिकेटच्या खऱ्या राजाच्या बॅटमधून शंभर नंबर ८२. महत्त्वाच्या सामन्यात त्याने किती चांगली खेळी केली. खरा चॅम्पियन आणि लाखो लोकांसाठी प्रेरणा. याआधीही आमिरने विराटला सहाव्या शतकासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

 

आपल्या ट्विटमध्ये आमिरने विराटच्या खेळीचे कौतुक करत त्याला क्रिकेटचा खरा बादशाह म्हटले आहे. आता विराटच्या सलग दुसऱ्या शतकावरही आमिरने त्याच्या फलंदाजीचे कौतुक केले आणि अनेकांची प्रेरणाही सांगितली.

 

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, आयपीएल २०२३ च्या पहिल्या सामन्यात चेन्नईचा पराभव करणाऱ्या गुजरात टायटन्सने शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा विकेट्स राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने पाच गडी गमावून १९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने १९.१ षटकांत चार गडी गमावून 198 धावा केल्या आणि सामना जिंकला. बंगळुरूकडून विराट कोहलीने नाबाद १०१ धावांची खेळी केली. त्याचवेळी गुजरातकडून शुभमन गिलने नाबाद १०४  धावांची खेळी केली.