हरदीपसिंग निज्जरच्या हत्येच्या प्रकरणामध्ये अमेरिका आपली बाजू घेईल या भ्रमात असलेल्या कॅनडाचा चांगलाच भ्रमनिरास झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे नुकत्याच अमेरिका आणि भारत देशात झालेल्या चर्चेत अमेरिकेने हरदीपसिंग निज्जर प्रकरणावर काहीही भाष्य केले नसल्याचे समोर येत आहे.
कॅनडाचा रहिवासी असलेल्या खलिस्तानी दहशदवादी हरदीपसिंग निज्जरचा भारतीय गुप्तचर विभागाच्या लोकांनी येऊन खून केला असल्याचा आरोप संसदेमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. यावेळी भारतावर अमेरिका दबाव टाकेल अशी आशा कॅनडाला होती. मात्र झालेला बैठकीमध्ये असे काही झाले नसल्याचे वृत्त समोर येत आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांची नुकतीच अमेरिकेमध्ये चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी जागतिक घडामोडींविषयी चर्चा केली. याच बरोबर येणाऱ्या बैठकींमध्ये ते अजून काही विषयायांवर चर्चा करू शकतात. असे म्हटले जात आहे.
भारतावर आरोप केल्यानंतर अमेरिका देखील भारतावर दबाव टाकायचा प्रयत्न करेल असे कॅनडाला वाटत होते. मात्र अँटनी ब्लिंकन यांना निज्जर प्रकरणी पत्रकारांनी प्रश्न विचारताच उत्तर देण्यास नकार दिला असल्याचे वृत्त समोर येत आहे.