कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी काही दिवसांपूर्वी भारतावर गंभीर आरोप केले होते. यानंतर भारताने कॅनडाला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. भारताचा हा पवित्रा पाहून ट्रुडो अखेर नरमले आहेत. 'भारत एक वाढती आर्थिक शक्ती असून, आम्ही भारताशी घनिष्ठ संबंध ठेवण्याबाबत प्रतिबद्ध आहोत' असं ते म्हणाले.
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची कॅनडामध्ये हत्या झाली होती. यामध्ये भारताचा हात असल्याचा आरोप ट्रुडो यांनी केला होता. यानंतर भारत-कॅनडा या दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र आता ट्रुडो यांनी नमती भूमिका घेत आपण भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करु, असं म्हटलं आहे.
गुरुवारी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ट्रुडो यांनी हे मत व्यक्त केलं. ते म्हणाले, "भारत एक वाढती आर्थिक शक्ती, आणि महत्त्वाचा भू-राजकीय देश आहे. गेल्या वर्षी आम्ही सादर केलेल्या इंडो-पॅसिफिक नीतीप्रमाणे आम्ही भारतासोबत घनिष्ठ संबंध ठेवण्याबाबत गंभीर आहोत."
"सोबतच, भारतानेही या (निज्जर हत्या) प्रकरणाच्या तपासात कॅनडाला संपूर्ण सहकार्य करावं हेदेखील मी याठिकाणी स्पष्ट करू इच्छितो" असंही ते पुढे म्हणाले.