NEPAL FLODDS: भारताकडून मदतीचा पाचवा हप्ता रवाना; ५.५ टन औषधे आणि ११ सदस्यीय बचाव पथक नेपाळमध्ये दाखल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
विनाशकारी पुरामुळे मृतांचा आकडा हजार पार, भारताकडून युद्धपातळीवर मानवतावादी साहाय्य
विनाशकारी पुरामुळे मृतांचा आकडा हजार पार, भारताकडून युद्धपातळीवर मानवतावादी साहाय्य

 

नवी दिल्ली 

नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी महापुराच्या पार्श्वभूमीवर भारताने मदतीचा हात आणखी पुढे केला आहे. भारताने बुधवारी नेपाळसाठी ५.५ टन आवश्यक औषधसाठा आणि ११ जणांचे विशेष बचाव पथक घेऊन जाणारे पाचवे विमान रवाना केले आहे. गेल्या आठवड्यात नेपाळमध्ये झालेल्या भीषण मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे मृतांचा आकडा एक हजारावर पोहोचला असून, हजारो नागरिक अजूनही बेपत्ता आहेत.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयी माहिती दिली. भारताने आतापर्यंत एकूण ६८.५ टन मदत साहित्य नेपाळला पाठवले आहे. याआधीही भारताने वैद्यकीय पथक, पॅरामेडिक्स आणि शोध व बचाव कार्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक उपकरणे नेपाळमध्ये पाठवली होती.

भारताकडून सातत्यपूर्ण मानवतावादी मदत

२६ ऑगस्ट रोजी नेपाळमध्ये पूर आल्यानंतर काही तासांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. या आपत्कालीन परिस्थितीत भारताकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले होते. मध्य नेपाळमध्ये पुरामुळे मोठे नुकसान झाले असून अनेक रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत. अशा बिकट परिस्थितीत भारत सरकारच्या या साहाय्यामुळे बचाव कार्याला मोठी गती मिळाली आहे.



Latest News