एस. जयशंकर यांचे खडे बोल: दहशतवादाला पाठीशी घालणारे देश आणि जागतिक संघर्षावर भारताची कडक भूमिका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर नवी दिल्लीत एका कार्यक्रमात परराष्ट्र धोरण आणि जागतिक सुरक्षा मुद्द्यांवर भाष्य करताना
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर नवी दिल्लीत एका कार्यक्रमात परराष्ट्र धोरण आणि जागतिक सुरक्षा मुद्द्यांवर भाष्य करताना

 

नवी दिल्ली 

दहशतवादाचा वापर 'राज्यकारभाराचे साधन' (instrument of statecraft) म्हणून करणे पूर्णपणे अस्वीकार्य असून त्याचे कधीही समर्थन किंवा तळाेलाई केली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी सांगितले. सर्वच देश दहशतवादाविरोधात 'शून्य सहनशीलता' (zero tolerance) दाखवत नसल्यामुळेच हा धोका अद्याप कायम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

जागतिक संघर्ष आणि शांततेचे महत्त्व

नवी दिल्लीत चिन्मय मिशनच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. जगातील सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर शांततेचे महत्त्व अधोरेखित करताना जयशंकर यांनी सावध केले की, "युद्ध जगात कुठेही झाले तरी ते प्रत्येक ठिकाणची शांतता धोक्यात आणते." युक्रेन आणि पश्चिम आशियातील दोन प्रमुख संघर्षांचा उल्लेख करून ते म्हणाले की, या संघर्षांत ज्यांचा काहीही संबंध नाही, असे दूरवरचे समाज, अर्थव्यवस्था आणि सर्वसामान्य लोक प्रत्यक्ष किंमत मजत आहेत.

"आपण हतबल प्रेक्षक बनून राहू शकत नाही. संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच एकमेव पर्याय आहे, अशी भारताची जागतिक भावना आहे," असे परराष्ट्रमंत्री म्हणाले. भारताकडून शांतता प्रस्थापनेसाठी प्रयत्न सुरू असून या दिशाने इतर भागीदारांसोबत काम करण्यास देश तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि बहुपक्षीयता

टेक्नॉलॉमीच्या बदलत्या भूमिकेवर बोलताना जयशंकर म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे सर्व बदलांचे मूळ ठरू शकते, परंतु एवढी मोठी आणि परिणामकारक गोष्ट केवळ मोजक्या लोकांच्या हातात सोपवली जाऊ शकत नाही. यासाठी भारत 'जबाबदार, सर्वसमावेशक आणि मानवकेंद्रित दृष्टिकोनाचा' जोरदार पुरस्कर्ता आहे.

तसेच, संयुक्त राष्ट्रांनी (UN) जागतिक संकटांवर केवळ प्रेक्षक न बनता नेतृत्व दाखवले पाहिजे, असे सांगत 'सुधारित बहुपक्षीयतेची' (reformed multilateralism) गरज आजच्या काळात अधिक तीव्रतेने भासत असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताने 'वसुधैव कुटुंबकम्' ही केवळ शिकवण दिली नसून ती प्रत्यक्षात आचरणात आणली आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.