दहशदवादाशी लढताना 'राजकीय सोय' पाहू नये - एस. जयशंकर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर
भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर

 

दहशतवाद, कट्टरतावाद आणि हिंसाचाराविरुद्ध लढताना 'राजकीय सोय पाहिली जाऊ नये आणि सदस्यांनाही असे करू दिले जाऊ नये", असे आवाहन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बोलताना केले. काही देशांनीच अजेंडा ठरविण्याचे दिवस पंपले असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले. त्यांच्या या विधानाला भारत- कॅनडामध्ये सध्या सुरू असलेल्या वादाची पार्श्वभूमी असल्याचे मानले जाते.

आमसभेच्या ७८ व्या सत्रात बोलताना परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी कॅनडावर नाव न घेता टीका करतानाच काही मुद्द्यांवरून इतर श्रीमंत देशांचेही कान टोचले, जयशंकर म्हणाले, "भौगोलिक एकात्मता आणि इतर देशांच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप न करण्याचे धोरण यांचा सोयीने वापर केला जाऊ नये. काही निवडक देशांनीच जागतिक राजकारणाचा अजेंडा ठरवावा आणि इतरांनी त्यांचे अनुसरण करावे, हे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. कोरोना काळात वाटपात जशी असमानता होती, तसा प्रकार पुन्हा पडू दिला जाऊ नये. 

त्याचप्रमाणे तापमानवाढ रोखण्यासाठीची कृती करताना ऐतिहासिक जबाबदारीचे आणि उत्तरदायित्वाचे भान सुटणे योग्य नाही. गरीब देशांकडील अत्र आणि ऊर्जेचा ओप श्रीमंत देशांकडे वळविण्यासाठी बाजारपेठांमधील वर्चस्वाचा वापर करणे चुकीचे आहे. दहशतवाद, कट्टरतावाद आणि हिंसाचार यांच्याविरुद्धच्या युद्धात राजकीय सोय पाहणे अयोग्य आहे." सर्व देशांनी निर्धार केल्यास एक न्याय्य, समानतेवर आधारित लोकशाहीवादी व्यवस्था निश्चितच निर्माण होईल, असा विश्वासही जयशंकर यांनी व्यक्त केला.

विविध चर्चामध्ये आपण नियमाधारित व्यवस्था कायम ठेवण्याबाबत चर्चा करतो. मात्र, हा फक्त चर्चेतील मुद्दा झाला. कारण अजूनही काही निवडक देशच अजेंडा आणि नियम निश्चित करण्याचा प्रयत्न करतात. हे असेच चालू राहणार नाही आणि या एकाधिकारशाहीला आव्हानही दिले जाईल, असेही ते पुढे म्हणाले. 
 
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भाषणात मांडले हे महत्त्वाचे मुद्दे:
  • 'अलिप्तते'च्या भूमिकेतून भारताचा आता 'विश्व मित्रा'च्या भूमिकेत प्रवेश
  • सर्वांशी सहकार्य हीच आमची भूमिका
  • महिला आरक्षण विधेयक हे अत्यंत
  • महत्त्वपूर्ण चांद्रयानचे यश हा 'अमृतकाला'ची एक झलक
  • वास्तवाचे भान सुटल्यास, ते लक्षात आणून देण्याचे धाडस हवे
  • जगाची व्यवस्था नियमाधारित हवी