रशिया युक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीयांची लवकरच मुक्तता

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 4 Months ago
 रशियात अडकलेले भारतीय
रशियात अडकलेले भारतीय

 

रशियात अडकलेल्या भारतीयांच्या बाबतीत परराष्ट्र मंत्रालयाने मदतीचे आश्वासन दिले आहे. रशियन सैन्यात सपोर्ट स्टाफ म्हणून काम करणाऱ्या लोकांना सुरक्षितपणे भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सरकारने म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, रशियन सैन्यात सपोर्ट स्टाफ म्हणून काम करणाऱ्या भारतीयांच्या लवकर सुटकेसाठी सरकार मॉस्कोशी सतत संपर्कात आहे. रशियासोबत सुरू असलेल्या युद्धामुळे भारताने आपल्या नागरिकांना हिंसाचारग्रस्त भागात जाण्याचे टाळण्यास सांगितले आहे.

चांगल्या नोकऱ्या देण्याच्या बहाण्याने रशियात बोलावलेले 20 भारतीय नागरिक अडकल्याची कबुली भारत सरकारने दिली आहे. "आम्हाला माहिती मिळाली आहे की 20 भारतीय नागरिक रशियाच्या विविध भागात अडकून पडले आहेत. या सर्वांना चांगल्या नोकरीच्या बहाण्याने रशियाला बोलावण्यात आले होते. ते रशियाच्या वेगवेगळ्या भागात आहेत आणि दुतवासाच्या संपर्कात आहेत.", परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. (Russia News)

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, सरकार भारतीय आणि रशियन दोन्ही अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. अनेक भारतीय चांगल्या नोकऱ्या मिळवण्याच्या बहाण्याने रशियात गेले पण त्यांना युक्रेनशी युद्ध करण्यास भाग पाडले गेले.

अशीच एक व्यक्ती हैदराबादमधील मोहम्मद सुफियान आहे, ज्याला एजंटांनी फसवले आणि रशियन सैन्यात भरती होण्यास भाग पाडले. सुफियानच्या कुटुंबीयांनी केंद्र सरकार आणि एमईएकडे अडकलेल्या तरुणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची आणि गुंतलेल्या एजंटांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. (Latest Marathi News)

दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, "आम्हाला समजले आहे की 20 लोक रशियात अडकले आहेत. लवकरच त्यांना सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत."