USA-IRAN WAR: अमेरिकेचे इराणवर आता दिवसाढवळ्या हवाई हल्ले

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 17 h ago
अमेरिकेने दिवसाढवळ्या इराणवर केले हवाई हल्ले
अमेरिकेने दिवसाढवळ्या इराणवर केले हवाई हल्ले

 

दुबई

होर्मुझ सामुद्रधुनीतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. आतापर्यंत केवळ रात्रीच्या वेळी होणारे अमेरिकेचे हवाई हल्ले आता दिवसाढवळ्या सुरू झाले आहेत. अमेरिकेच्या मध्यवर्ती कमांडने (Central Command) अधिकृतरीत्या या नवीन हल्ल्यांची माहिती दिली आहे.

लष्करी क्षमतेवर प्रहार

अमेरिकन सैन्याने जारी केलेल्या निवेदनानुसार, हे हवाई हल्ले इराणच्या लष्करी क्षमतेचा नाश करण्यासाठी केले जात आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीत व्यावसायिक जहाजांवर हल्ले करण्यासाठी इराण ज्या साधनांचा वापर करत आहे, ती निकामी करणे हे या हल्ल्यांचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

तणावाचा आखातावर परिणाम

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात झालेला तात्पुरता करार मोडकळीस आल्यानंतर दोन्ही देशांमधील लष्करी हालचाली वाढल्या आहेत. रात्रीच्या अंधारात होणाऱ्या हल्ल्यांनंतर आता दिवसा होणाऱ्या या आक्रमक हवाई कारवायांमुळे आखाती प्रदेशातील तणाव अधिकच वाढला असून, याचा परिणाम जागतिक सागरी व्यापारावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.