वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे व्हाईट हाऊसमध्ये भव्य स्वागत केले. द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करताना ट्रम्प यांनी दोन्ही देशांचे संबंध कधीही इतके चांगले नव्हते, असा विश्वास व्यक्त केला. भविष्यातील पिढ्यांसाठी समृद्धी आणि सुरक्षा बळकट करणारी भागीदारी निर्माण करण्यासाठी अमेरिका आणि चीन एकत्र काम करू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात दोन तासांहून अधिक काळ बैठक झाली. त्यानंतर ईस्ट रूममध्ये आयोजित राजनैतिक मेजवानीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या भविष्याबद्दल toast केला. अमेरिकन आणि चिनी नागरिकांनी नेहमीच व्यापार, ज्ञान आणि विचारांची देवाणघेवाण केली असून हाच परस्पर आदराचा पाया असल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले. या बैठकीत ऐतिहासिक संबंधांवर प्रकाश टाकण्यात आला.
द्विपक्षीय चर्चेदरम्यान चिनी राष्ट्रापती शी जिनपिंग यांनी तैवानच्या मुद्द्यावर चीनची भूमिका स्पष्ट करत अमेरिकेने यावर सावधपणे काम करावे, असे सुचवले. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध सावधगिरी बाळगण्याऐवजी आपापल्या शक्तींचा योग्य वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीला ॲमेझॉनचे जेफ बेझोस, मेटाचे मार्क झुकरबर्ग, गुगलचे सुंदर पिचाई, आणि टेस्लाचे एलॉन मस्क यांच्यासह अनेक जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. व्हाईट हाऊसबाहेर 'फ्री तिबेट' आणि 'फ्री हाँगकाँग'च्या घोषणा देत निदर्शनेही करण्यात आली.