USA-IRAN WAR: हॉर्मुझ सामुद्रधुनीजवळील लारक बेटावर अमेरिकेचे हवाई हल्ले, इराणकडून प्रतिहल्ल्याची घोषणा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 38 m ago
हॉर्मुझ सामुद्रधुनीजवळील लारक बेटावर अमेरिकेचे हवाई हल्ले
हॉर्मुझ सामुद्रधुनीजवळील लारक बेटावर अमेरिकेचे हवाई हल्ले

 

वॉशिंग्टन 

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष अधिक तीव्र झाला असून, अमेरिकन सैन्याने रविवारी हॉर्मुझ सामुद्रधुनीजवळील लारक बेटावर (Larak Island) इराणच्या दोन क्षेपणास्त्र प्रक्षेपण प्रणालींवर (Launch Systems) हवाई हल्ले केले आहेत. जुलै महिन्या नंतर इराणच्या भूमीवर अमेरिकेकडून झालेला हा पहिलाच ज्ञात लष्करी हल्ला आहे.

अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे (IRGC) सैनिक हॉर्मुझ सामुद्रधुनीमध्ये समुद्रात जलसुरंगे (Sea Mines) सोडण्यासाठी क्षेपणास्त्रे तयार करत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर अमेरिकन लष्कराने ही धडक कारवाई केली. इराणच्या लारक बेटावर झालेल्य या हल्ल्यात काही सैनिक आणि नागरिक जखमी किंवा मृत्यूमुखी पडल्याचे इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डने दुजोरा दिला आहे. तसेच या हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर आणि शिक्षा दिली जाईल, असा इशारा इराणने दिला आहे.

तणाव वाढल्याने जागतिक बाजारात चिंतेचे वातावरण

अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारीपासून इराणविरोधात संयुक्त लष्करी मोहिमेची सुरुवात केली होती, ज्याला आता सहा महिने पूर्ण झाले आहेत. इराणने याआधी इस्रायल आणि अमेरिकन तळ असलेल्या आखाती देशांवर हल्ले केले होते. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यातच हॉर्मुझ सामुद्रधुनीमध्ये नवीन सुरक्षा धोके निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला होता. दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी मुस्लिम बहुसंख्य देशांना अमेरिका आणि इस्रायलविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. या ताज्या संघर्षामुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखीनच वाढला आहे.



Latest News