UGC NET Results 2026: यूजीसी-नेट परीक्षेचे निकाल जाहीर; ८४ विषयांपैकी ४ हजारांहून अधिक उमेदवार JRF साठी पात्र

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
यूजीसी-नेट परीक्षेत देशातून हजारो विद्यार्थी यशस्वी, NTA ची अधिकृत घोषणा
यूजीसी-नेट परीक्षेत देशातून हजारो विद्यार्थी यशस्वी, NTA ची अधिकृत घोषणा

 

नवी दिल्ली 

देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या यूजीसी-नेट (UGC NET) परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) शुक्रवारी उशिरा ८४ विषयांचे निकाल जाहीर केले असून, ४ हजारांहून अधिक उमेदवारांनी कनिष्ठ संशोधन अध्य्क्षता (JRF) साठी पात्रता मिळवली आहे, अशी माहिती NTA च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

या परीक्षेसाठी बसलेल्या ६ लाख ७ हजार उमेदवारांपैकी ९७ हजारांहून अधिक जण पीएचडी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत, तर ४ हजारहून अधिक जण जेआरएफसाठी पात्र झाले आहेत. दरम्यान, यावर्षी जून महिन्यात घेण्यात आलेल्या इंग्रजी, वाणिज्य (Commerce) आणि समाजशास्त्र (Sociology) या विषयांच्या प्रश्नपत्रिकेत तज्ज्ञ समितीला भाषांतर, टंकलेखन आणि तथ्यात्मक त्रुटी आढळल्या होत्या. त्यामुळे NTA ने या तीन विषयांच्या परीक्षा रद्द करून त्या पुन्हा घेण्याचे आदेश दिले होते.

९ आणि १० सप्टेंबर रोजी होणार फेरपरीक्षा

NTA ने १६ ऑगस्ट रोजी अंतरिम उत्तरपत्रिका (Answer Key) जाहीर केली होती. त्रुटी आढळलेल्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन विषयांच्या परीक्षा आता आगामी ९ आणि १० सप्टेंबर रोजी नव्याने आयोजित केल्या जाणार आहेत. या फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. भारतीय विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पद आणि जेआरएफसाठी पात्रता ठरवण्यासाठी NTA द्वारे ही राष्ट्रीय पात्रता परीक्षा घेतली जाते.



Latest News